आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बेसब्र' करणारी गाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमातल्या पात्रांमध्ये आपण रमतो, त्यात स्वत:ला शोधण्याचा प्रयत्नही करतो. तसंच गाण्यांचंही. एखादं गाणं आपल्याला आवडलं तर त्यात फक्त संगीताचा वाटा नसतो, शब्दांची गुंफणही वेड लावते. मुंबई आकाशवाणीवर रेडिओ जाॅकी म्हणून काम करताना लेखिकेला सापडलेली वेड लावणारी, आयुष्याला नवा अर्थ प्राप्त करून देणारी ही काही गाणी...

सप्टेंबर २०००मध्ये आलेल्या ‘फ़िज़ा’ या चित्रपटात नायिकेची भूमिका करिश्मा कपूरने साकारली आहे. फिजा़ एक धाडसी मुलगी आहे जी आपल्या भावाला मारण्याचं धाडस दाखवते कारण तो दहशतवादाकडे वळलाय. त्याला सुखरूप मृत्यू यावा म्हणून ती त्याचा खून करते. अशीच काहीशी भूमिका काजोलने ‘फना’ चित्रपटात साकारली आहे. झूनी अली बेग (काजोल) तिच्या नवऱ्याला रेहानला म्हणजे आमिर खानला स्वत: मारते कारण तो दहशतवादी असतो. स्त्रीचं सक्षम रूप दाखवणारे हे चित्रपट. फिज़ामधल्या एका गाण्याच्या ओळी समाजातील स्त्रीच्या परिस्थितीची जाणीव करून देतात.

घने एक पेड़ से मुझे, झोंका कोई लेके आया है
सूखे इक पत्ते की तरह , हवा ने हर तरफ उड़ाया है।
नागेश कुकनूरच्या डोरमध्ये ज्या प्रकारे गावातल्या रूढी व एका विधवा स्त्रीची दु:खं आणि व्यथा दाखवल्या आहेत आणि त्यातून तिला प्रोत्साहन देणाऱ्या गुल पनागचं व्यक्तिमत्त्व पण सशक्त आहे.

“बहता है मन कहीं, कहां जानते नहीं
कोई रोक ले यहीं,
भागे रे मन कहीं आगे रे मन
चला जाने किधर जानूं ना...”
‘चमेली’ चित्रपटात चमेली म्हणजेच करीना कपूरचं हे गाणं. या चित्रपटात एका रात्रीत किती काय काय घडतं. व्यवसायाने वेश्या असलेली चमेली स्मार्ट आणि संवेदनशील आहे. आशावादी असून तिचा प्रेमावर विश्वास आहे आणि जगाला प्रेम देणं हेच तिचं काम. बाहेरचं जग कितीही कठोर वागलं तरी. दुसरीकडे २००७ मध्ये आलेला ‘लागा चुनरी में दाग’सुद्धा वेश्यांची गोष्ट सांगणारा आहे. पण यातली नायिका विभावरी म्हणजे रानी मुखर्जी घरातल्या आर्थिक परिस्थितीमुळे मुंबईत वेश्येचं काम करते. पुढे ती हाय प्रोफाइल एस्कॉर्ट होते पण तिला तिचा व्यवसाय बहिणीपासून लपवावा लागतो. वाराणसीत राहणारी विभा स्वच्छंदी, संवेदनशील, हसरी आहे, पण परिस्थितीमुळे तिलाही स्वतःला बदलावं लागतं. उत्तर प्रदेशातल्या बोलीभाषेचं पुट असलेलं हे गाणं ऐकायला मस्त वाटतं.

जेब में हमरी, दुहि रुपैया, दुनिया को रखें, ठेंगे पे भैया
सुख दु:ख को खूंटी पे टांगे, और पाप-पुण्य चोटीसे बांधे
अरे नाचे हैं हम ताता थैया, हम तो ऐसे हैं भैया...
ये अपना फैशन है भैया
मुंबई म्हटलं की मायानगरी. पालकांपासून लांब राहणाऱ्या मुलींच्या आईवडिलांना त्यांची काळजी असते. पण मुंबईत सगळंच वाईट असंही नाही. आयशा (कंकणा सेन) एकटी मुंबईत येते. तिला लेखक व्हायचं असतं. ‘वेक अप सिड’मधली तिची भूमिका स्वाभिमानी आहे. परिपक्व मुलगी दाखवली आहे ती, जिला बऱ्यावाईटाची जाणीव आहे, तरी प्रेमाच्या बाबतीत होणारा तिच्या मनाचा गोंधळ या ओळी स्पष्ट सांगतात-

“सुन रही हूं,
सुधबुध खोके, कोई मैं कहानी
पूरी कहानी है क्या, किसे है पता
मैं तो किसीकी होके, ये भी ना जानी
रुत है ये दो पल की या रहेगी सदा...
जो बरसे सपने बूंद बूंद
नैनों को मूंद मूंद
कैसे मैं चलूं, देख ना सकूं अनजाने रास्ते”

हीच कंकणा ‘पेज-३’मध्ये माधवी या पत्रकाराची भूमिका साकारताना दिसते, जिला कामाच्या ठिकाणी होणाऱ्या राजकारणाचा व खोटेपणाचा त्रास होतो आणि ती नोकरी सोडायला तयार होते.

‘डोर’मधल्या मीराचं दु:ख सासरच्या लोकांमुळे असलं तरी प्रत्येकीचं माहेर चांगलंच असंही नाही. ‘लज्जा’ चित्रपटात सीतेच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. गर्भवती असलेली वैदेही (मनीषा कोईराला) तिच्या अभद्र नवऱ्याला व आधार न देणाऱ्या माहेराला सोडून पळते आणि पोटातल्या बाळाला जन्म देण्याचा निश्चय करते. वैदेहीसारख्या कित्येक मुलींच्या मनातली उलाढाल दाखवणाऱ्या या ओळी.
चल चलें... इन गलियों से, चल चलें... रंग रलियों से
लूट ना लें प्यासे भँवरें खुशबू महकी कलियों से
ये नहीं चाहत के काबिल, मेरी अदा भी है का़तिल
बड़ी मुश्किल बाबा बड़ी मुश्किल

‘ब्लॅक’ चित्रपटात रानी मुखर्जीचा रोल पण आव्हानात्मक होता. मिशेल जन्मापासून अंध, मूक व बधीर मुलगी आहे आणि तरीही तीच तिच्या शिक्षकाला निराशेतून बाहेर पडायचे मार्ग शिकवते.

“नरम गुनगुनी धूप से बातें की हैं मैंने,
पानी के बहने में हंसी सुनी है मैंने
सब कहते हैं दीप बुझा है, लेकिन बाती सो जाती है।”
निराशेतून आशेचे मार्ग शोधायला आपणच आपले असतो. असाच संदेश देणारा अाणखी एक सिनेमा म्हणजे ‘इंगलिश विंगलिश.’ शशी नावाच्या मध्यमवयीन महिलेची भूमिका श्रीदेवीने साकारली आहे. इंग्रजी भाषा येत नसल्याने तिचा नवरा व मुलं सारखी तिला हिणवत असतात. भाचीच्या लग्नाकरिता तिचं अमेरिकेत जाणं होतं. तिकडे येणाऱ्या समस्यांना शशी सामोरी जाते. कोणालाही न सांगता इंग्रजी शिकायचा क्लास लावते आणि बोलून दाखवते. त्यातल्या या ओळी-

“गुस्ताख दिल, दिल में मुश्किल, मुश्किल में दिल
गुस्ताख़ दिल, थोडा़ संगदिल, थोड़ा बुज़दिल”
या सिनेमात एक ४०-४५ वर्षांची बाई इंग्रजी शिकताना दाखवली आहे. कोणतंही काम आपण कधीही शिकू शकतो, स्वतःवर विश्वास आणि धडपड करायची तयारी हवी.

सध्या सिनेजगतात सर्वात लहान वयाची अभिनेत्री आलिया भट असावी. वयाच्या २३व्या वर्षी तिने विविध भूमिका असलेले कित्येक सिनेमे केलेत. ‘हायवे’ची वीरा असो वा ‘2 स्टेट्स’ची अनन्या. वीरा लहानपणी तिच्यावर झालेल्या मानसिक, शारीरिक छळाचा विरोध करते पण समाज तिला खरं बोलूच देत नाही. तिला त्या हाय प्रोफाइल आयुष्याचा उबग येतो आणि ती घर सोडून निघून जाते. ‘हायवे’चं हे गाणं परिस्थितीनुरूप आहे.
“जुगनी मेल मेल के, कूद फांद के, चाक चौगड्डे जावे
मौला तेरा माली, ओ हरियाली जंगल वाली
एवैं लोकलाज की सोच सोच के क्यों है आफत डाली
तू ले नाम रब का, नाम सांई का
अली अली अली अली”

अशा प्रत्येक व्यक्तिरेखेतून काहीतरी शिकण्यासारखं नक्कीच आहे. आपलं व्यक्तिमत्त्व संपन्न करायला तो स्पार्क आपल्यात हवाच. आजच्या काळात तर नक्कीच, जेव्हा...

“रास्ते भागे, पांवों से आगे, जिंदगी से चल, कुछ और भी मांगे
क्यों सोचना है जाना कहां? जायें वहीं ले जाये जहां... बेसब्रियाँ!

नेहा परांजपे, ठाणे
nehaawaze@gmail.com
बातम्या आणखी आहेत...