नोकियाचा धमाकेदार म्युझिक / नोकियाचा धमाकेदार म्युझिक फोन

दिव्य मराठी

Apr 28,2012 05:56:36 AM IST

जगातील सर्वात मोठी मोबाइल कंपनी नोकियाने एक आकर्षक म्युझिक फोन सादर केला आहे. या फोनचे वैशिष्ट्ये म्हणजे यात ड्वेल सिमकार्डची सोय आहे. नोकिया एक्स-202 मॉडेल असे याचे नाव असून यात एफएम, एमपी-3, विशेषत्वे म्युझिक की, इनबिल्ट लाऊडस्पीकर, आणि 32 जीबीपर्यंत क्षमता वाढवणार्‍या मेमरी कार्डाची सोय केलेली आहे. या फोनचे वैशिष्ट्ये असे की, हा स्लिम तर आहेच आणि वजन फक्त 93 ग्रॅम आहे. यात नोकियाकडून मोफत अर्मयाद गाणी डाऊनलोड केलेली आहेत. याचा स्क्रीन 2.2 इंचाचा असून यातील गाण्याचा आनंद म्युझिक सिस्टिम किंवा कार स्टिरिओवरही घेऊ शकता. यात सिमकार्ड मॅनेजर असून तो बरेच काही काम करतो. याचा कॅमेरा 2 मेगापिक्सलचा असून बॅटरी पावणेदहा तास चालते. त्यामुळे कित्येक तास तुम्ही गाणी ऐकू शकता. हा निळा, मोरपंखी यासह अनेक रंगांत उपलब्ध आहे. हा फोन पुढच्या महिन्यात तुमच्या जवळच्या स्टोअरमध्ये उपलब्ध होईल.

X
COMMENT