या मोबाइलच्या खरेदीसाठी / या मोबाइलच्या खरेदीसाठी रांगा

दिव्य मराठी नेटवर्क

May 26,2012 03:45:47 AM IST

आतापर्यंत कोणत्याही मोबाइल कंपन्यांनी सादर केलेला नाही असा ‘नोकिया प्यूअर व्ह्यू 80’ नोकिया बाजारात उपलब्ध करून देत आहे. यात 41 मेगापिक्सल कॅमेरा लावण्यात आलेला आहे. या मोबाइलसाठी तुम्हाला नोकियाच्या वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे.
मोबाइल बाजारात येताच कंपनी याची माहिती लगेच कळवणार आहे. कंपनीने सध्या या मोबाइलच्या हँडसेटची किंमत किती असेल हे जाहीर केलेले नाही, पण इतके नक्की की, भारतीय बाजारपेठेत लवकरच हा मोबाइल सादर करणार आहे. या मोबाइलमध्ये 1.3 गीगाहर्ट्झ सिंगल कोर चिप असणार आहे. 4 इंचांचा डिस्प्ले, 512 एमबी रॅम, 16 जीबी इंटरनल मेमरी इत्यादी सुविधा आहेतच.

X
COMMENT