गॅजेटच्या दुनियेत / गॅजेटच्या दुनियेत

दिव्य मराठी

Apr 28,2012 05:59:56 AM IST

फुजीचा लाँग झूम कॅमेरा
ज्या लोकांना निसर्गाचा आनंद घेणे आवडते, त्यांच्यासाठी फुजीने दूरचा झूम कॅमेरा सादर केला आहे. फाइनपिक्स जेझेड 100 नावाचा हा कॅमेरा बर्‍याच दूर अंतरावरील दृश्याचे दज्रेदार फोटो घेतो. या कॅमेर्‍याच्या मदतीने ‘वाइड अँगल’ची दृश्ये घेता येतात. कॅमेर्‍यात दृश्याप्रमाणे त्याचा ‘मोड’ सेट करता येतो. त्यामुळे 360 डिग्री अँगलमध्येही फोटो काढता येतात. यात इनबिल्ट रिकग्नेशन ऑटो मोड तंत्राच्या साह्याने कॅमेरा स्वत:च सीन पाहून सेटिंगची निवड करतो. याच्या साह्याने 720 पिक्सलची एचडी मूव्ही पण घेऊ शकता.

ओएमआर स्कॅनर

ओएमआर स्कॅनर आता भारतीय बाजारात उपलब्ध होणार आहे. सेकॉनिक आर -3500, सेकॉनिक-1800 आणि सेकॉनिक एसआर-55 नावाच्या मॉडेलची रेंजच सादर करण्यात येत आहे. याला ओएमआर तंत्र वापरून बनवण्यात आले आहे. या स्कॅनरमध्ये इनबिल्ट बारकोड रीडर आणि प्रिंटर लावण्यात आले आहे. हे स्कॅनर पेन्सिल आणि पेनच्या साह्याने बनवण्यात आलेले बबल्स, चेक मार्क, टिक मार्क वाचून अपेक्षित परिणाम देतो. एसआर-55 एका तासात सुमारे 1 हजार शीट रीड करतो. एसआर-1800 ची स्पीड 1800 शीट प्रतितास तर एसआर - 3500 ची स्पीड 3500 प्रतितास इतकी आहे. किंमत अनुक्रमे 85 हजार, 2 लाख 70 हजार आणि 4 लाख 85 हजार इतकी आहे.

मोबाइलवर शिका इंग्रजी

मोबाइल फोनची गरज दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. याच्या वापराचे अनेक प्रकार दिसून येतात. आता याच शृंखलेतील आणखी एक फायदा समोर आलेला आहे. तो आहे इंग्रजी शिकवण्याचा. यासाठी पॅरागॉन साफ्टवेअर ग्रुप आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस या दोघांनी मिळून आयफोन आणि आयपॅडवर ऑक्सफर्ड अँडव्हान्स लर्नर्स डिक्शनरी आणण्याची जोरदार तयारी करत आहेत. या अँप्लिकेशनमध्ये माय व्ह्यू चा ही समावेश आहे. त्यामुळे शब्दांचा अर्थ शोधणे सोपे होते. यात पूर्ण वाक्य कसे बोलले पाहिजे, शिकवण्याची व्यवस्था आहे. शिवाय शब्दांसोबत चित्र किंवा ग्राफिक्ससुद्धा आहेत. यात 58 हजार वाक्यांचे आवाज ऑनलाइन ऐकू शकता. जे सातत्याने वापरात येतात अशा 3 हजार शब्दांचा समावेश आहे.

X
COMMENT