आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाथा हाेमिअाेपॅथीच्या जनकाची

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाेमिअाेशास्त्राच्या मूलभूत तत्वाचा शाेध लावणाऱ्या डाॅ. सॅम्युअल हानीमन यांचा जन्म जर्मनीमधील मिसेन या गावी १० एप्रिल १७५५ साली झाला हाेता. जर्मन भाषेबराेबरच त्यांचे लॅटीन, ग्रीक, इंग्रजी, अरेबिक भाषेचा दांडगा अभ्यास हाेता. १७७९ साली त्यांनी अॅलाेपॅथीच्या एम.डी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण करुन तत्कालीन प्रचलीत वैद्यकीय सेवेस प्रारंभ केला. मात्र, त्या पॅथीतील उपचार अाणि त्याचे दुष्परिणाम बघून त्यांना तत्कालीन उपचारप्रध्दतीत समाधान वाटत नव्हते. 

त्याच - त्याच कारणाने नागरिक पुन्हा - पुन्हा अाजारी पडत असल्याचे बघून त्यांनी या बाबींवर संशाेधन करण्याचे ठरवले. डाॅ. हानीमान हे अत्यंत संवेदनशील मनाचे असल्याने त्यांनी अत्यंत धाडसी पाऊल उचलले. वैद्यकीय सेवा बंद करुन त्यांना अवगत असलेल्या १२ भाषांतील वैद्यकीय ज्ञानाचे भाषांतर करण्यास प्रारंभ केला. १७९० साली विल्यम कुलेन लिखीत पुस्तकाचे भाषांतर करत असताना त्यांना मलेरीयावरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या  सिंकाेना बार्क या वनस्पतीची माहिती मिळाली. हे अाैषध मलेरीया बरा हाेण्यासाठी वापरले जात हाेते. मात्र, तेच कडू अाैषध जर निराेगी माणसाला दिले , तर त्यालादेखील मलेरीयासारखी लक्षणे निर्माण हाेत असल्याचे दिसून अाले. त्यासाठी त्यांनी स्वत:वरच प्रयाेग करुन पाहण्याचे ठरवले. 

सिंकाेना हे अाैषध ठराविक प्रमाणात घेतले. त्यानंतर काही दिवसातच त्यांच्यात मलेरीयासारखी लक्षणे  निर्माण झाली. त्यांनी त्यावर संशाेधन करण्यास प्रारंभ केला. या अाैषधातील घटक अाणि त्याच्या संशाेधनाअंती ते एका अनाेख्या निष्कर्षाप्रत पाेहाेचले. ताे निष्कर्ष असा हाेता की  जे अाैषधी गुणधर्म असलेले घटक निराेगी माणसात विशिष्ट अाजार निर्माण करु शकते, तेच अाैषध ताे अाजार बरा करु शकतात. या विचारातून हाेमिअाेपॅथी या शास्त्राचा जन्म झाला. उदाहणार्तथ जसे कांदा चिरल्यानंतर नाकात व डाेळ्यांत झाेंबल्यासारख हाेऊन पाणक्ष वाहते व अाग झाल्यासारखष हाेते. (हे तर फक्त कांद्याच्यावा वासानेहाेत) अशी लक्षणे साधरणपणे सर्दीच्या विकारात असतात. अशी लक्षणे असलेला रुग्ण हाेमिअाेपॅथीक तज्ञाकडे अाल्यास ताे तज्ञ त्याला ‘अॅलीअम सेपा’ हे कांद्यापासूनच  बनवले अाैषध विशिष्ट मात्रेत देताे. त्याद्वारेच ताे रुग्ण पूर्णपणे बरा हाेते.

डाॅ. हानीमन यांनी केवळ सिंकाेनाच्या संशाेधनावर न थांबता जवळपास १०० हून अधिक अाैषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती, मिनरल्स अाणि नैसर्गिक घटकांचा स्वत:वर, कुटुंबावर अाणि मित्रांवर अाैषधाेपचार करण्यास प्रारंभ केला. त्यातून निघालेला निष्कर्ष हा सिंकाेनाच्या निष्कर्षासारखेच हाेते. १७९० साली केलेल्या पहिल्या प्रयाेगानंतर त्या विषयावर ६ वर्ष संशाेधन करुन १७९६ साली त्यांनी पहिला प्रबंध सादर केला. त्याद्वारे त्यांनी खऱ्या अर्थाने हाेमिअाेपॅथीचे पहिले तत्व जगापुढे मांडले  अाहे. त्यांच्या ‘लेट लाइक बी क्युअर्ड बाय लाइक्स’ या तत्वावरच  हाेमिअाेपॅथी अाधारलेली अाहे . १७९० ते १८१० असे २० वर्ष प्रदीर्घ संशाेधन केल्यानंतर त्यांनी हाेमिअाेपॅथीचे मूळ तत्वज्ञान उलगडून दाखविणारे ‘अाॅरगॅनाॅन अाॅफ रॅशनल हिलींग’ या पुस्तकाचे लिखाण केले.  प्रचलीत पध्दतीमध्ये प्राण्यांवर प्रयाेग करुन निष्कर्ष काढले जातात. मात्र, स्वत:वर अाणि मनुष्यावर प्रयाेग करुन त्याद्वारे निष्कर्ष काढणारे पहिले डाॅक्टर असल्याने ‘फादर अाॅफ माॅडर्न एक्सपरीमेंट फार्माकाेलाॅजी’ म्हणून गाैरविले जाते.
बातम्या आणखी आहेत...