आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅट नव्हे, फिट रहा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वजन कमी करणे खरंच अवघड अाहे का? तर याचं खरं उत्तर अाहे अजिबातच नाही. खरंतर वजन कमी करण्यासाठी जेवण कमी करणे, फक्त सलाड, फळे अाणि सुप्स यावर जगणे हा पर्याय एकदम चुकीचा अाहे. हे पदार्थ अर्थातच पाेषक अाणि गरजेचे अाहे, पण फक्त हेच पदार्थ खाऊन वजन कमी करणे मात्र चुकीचे अाहे.
 
या पदार्थांमुळे तुमचे वजन नक्कीच कमी हाेईल, पण नंतर ते वजन मेन्टेन करणार कसे? कारण अायुष्यभरासाठी तुम्ही या पदार्थांवर जगू शकत नाही कधीतरी तुम्हाला नियमित जेवणावर यावंच लागेल, म्हणूनच जेवण कमी न करता कमी केलेले वजन म्हणजे हेल्दी वेटलाॅस असताे. 
 
कित्येकवेळा अापण बघताे काहीजण खूप वेळेस खातात, सारखं काही न काही खातच असतात तरी जाड हाेत नाही अाणि काहीजण कमी खाल्लं तरीही जाड हाेत जातात. असं का? याचं उत्तर या हेल्थ मंत्रात दडलेलं अाहे. ते म्हणजे दर तीन तासांनी थाेडं थाेडं काहीतरी खाणे.
 
दर तीन तासांनी खाण्याचे असे अाहे महत्त्व....
खूप लाेकांना असे वाटते की, वजन कमी करणे म्हणजे कमी खाणे, पण असे केल्यास याचा परिणाम उलटा हाेताे. साधे उदाहरण अाहे. जेव्हा एखाद्या गाेष्टीची कमतरता भासते तेव्हा अापण ती गाेष्ट साठवून ठेवण्याचा अाणि जपून वापरण्याचा प्रयत्न करताे. अापले शरीर अशाच प्रकारे काम करते. वजन कमी करण्यासाठी कमी जेवल्यामुळे किंवा स्वत:ला उपाशी ठेवल्यामुळे जेव्हा अापल्या शरीराला अन्नाची कमतरता जाणवते, तेव्हा चयापचय क्रिया मंद हाेते अाणि अापले शरीर  येणाऱ्या अन्नाला मेदाच्या (फॅट) रूपात साठवून ठेवते अाणि अशाच प्रकारे मेदाचे प्रमाण वाढून वजन वाढते.
 
असा हाेता फायदा
-जेव्हा अापण थाेड्या-थाेड्या अंतराने काहीतरी खाताे तेव्हा अापले शरीर अापण खाल्लेल्या प्रत्येक जेवणातील कॅलरीज मेदाच्या स्वरूपात न साठवता दैनंदिन कार्यासाठी वापरते.
-अापल्या शरीराची चयापचय क्रिया जलद हाेऊन जास्तीत जास्त कॅलरीज खर्च हाेतात. 
-जेव्हा तुम्ही २ मुख्य जेवणादरम्यान काहीतरी खातात तेव्हा पुढील जेवण हे अापाेअापच नियंत्रणात येते.
 
-अशाप्रकारे लहान मिड मिल्स घेतल्याने, शरीरातील जीवनसत्त्वांची झीज भरते अाणि जंक फूड खाण्याचा माेह टळताे. तर यागाेष्टींचा अापल्या दैनंदिन जीवनात समावेश नक्की करा अाणि परिणाम स्वत:च पहा.
 
अापण काय करू शकताे?
-दाेन जेवणादरम्यान  ३ तासांपेक्षा जास्त अंतर ठेवू नये.
-दिवसभरात कमीतकमी ६ ते ७ वेळा खाणे.{एका माेठ्या जेवणाला २ लहान जेवणात विभागात 
 जसे a) नास्ता - सकाळी ९ ते १० दुपारी ११ ते ११.३०
    b) दुपारचे जेवण - दुपारी १ ते २ वा. चहा ४ ते ४.३०
     c) रात्रीचे जेवण - संध्याकाळचा नास्ता ६ ते ६.३०, रात्रीचे जेवण  ८ ते ९ वा. 

- सामान्यत: अापण दिवसातून ३ ते ४ वेळेस खाताे, जसे नास्ता, दुपारचे जेवणे, पुन्हा नास्ता अाणि रात्रीचे जेवण. या दरम्यान हेल्दी पदार्थांचा समावेश करून जेवणांमधील अंतर भरून काढा.
- २ जेवणांतील अंतर भरून काढण्यासाठी तुम्ही त्यावेळी फळे, बदाम, अक्राेड कडधान्यांचे चाट, खाकरा, एक वाटी मुरमुरे, १ वाटी फुटाणे, १ कप ग्रीन टी, अंड्यातील पांढरे इ.
 
- शक्यताे सकाळचा नास्ता हा पाेटभर करावा, दुपारचे जेवण हे माफक प्रमाणात घ्यावे अाणि रात्रीचे जेवण हलके घ्यावे.

- राेज झाेपण्यापूर्वी १ कप काेमट दूध (साखर न घालता) व २ चिमूट हळद एकत्र करून घ्या.
बातम्या आणखी आहेत...