Home »Magazine »Niramay» News About Summer V Action Cool Tips

उन्हाळा सुसह्य हाेण्यासाठी टिप्स

राहुल सावंत, | Mar 20, 2017, 03:39 AM IST

  • उन्हाळा सुसह्य हाेण्यासाठी टिप्स
होळी सणानंतर उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढत जाताे. मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलमध्ये तर सूर्य अक्षरश: आग आेकू लागतो. वाढलेल्या उष्णतेचा थेट परिणाम मानवी शरीरमनावर होत असतो. अशक्तपणा, थकवा, चक्कर येणे, मूत्रमार्गाची आग, तळपाय व डोळ्यांची आग, केस गळणे, त्वचेवर पुरळ उठणे, सर्वांगाचा दाह होणे, डिहायड्रेशन, झोप न येणे, चिडचिड वाढणे या छोट्या-मोठ्या कुरबुरींसोबत उष्माघातामुळे मृत्यू येणे अशी लक्षणे उन्हाळयात वाढतात. निसर्गत:च मानवी शरीर बाह्य वातावरणामधील बदलानुसार समतोल साधण्याचा प्रयत्न करीत असते. त्रासदायक वाटणारा उन्हाळा आरोग्यासाठी सुसह्य व्हावा यासाठी काही आयुर्वेदिक टिप्स....
- मानवी शरीरामध्ये पित्ताचा प्रकाेप उष्णतेमुळे होत असल्याने पित्तशामक पातळ, मधुर असा आहार घ्यावा. साठेसाळीचा तांदूळ, सातूचे पीठ, तोंडली, दुधी, पडवळ, केळफुलाची भाजी अशा फळभाज्यांसोबत मूग व मसूरडाळीचे वरण आहारामध्ये ठेवावे. कलिंगड, खरबूज, टरबूज, कोहळा, काकडी, केळी, डाळिंब, द्राक्ष, आवळा, खजूर, नारळासोबत हंगामी मिळणारा रानमेळा अशा रसाळ फळांचे सेवन मुबलक करावे.
- दूध, तूप, लोणी, माठामधील थंड पाणी प्यावे.
- नारळपाणी, कोकम सरबत, ताजे ताक, फळांचा रस, निंबू मीठ, साखर पाणी, चिंच-कैरीचे पन्हे अशी सरबते घ्यावीत.
- थंड हवेच्या ठिकाणी पाण्याचे तुषार अंगावर झेलीत नदीकिनारी विश्रांती घ्यावी. सुती शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करावेत.
- वाळासोबत कापूर एकत्र करून त्याचा लेप किंवा चंदनाचा लेप शरीरावर लावावा. गार पाण्याने यथेच्छ स्नानाचा आनंद लुटावा.
आजच्या काळानुसार एअर कंडिशनरचा वापर यांसारख्या शीतोपचाराचा अवलंब करावा.
- पित्तपर्यायाने उष्णता वाढविणारे नागली, मेथी, शेवगा, वाटणे, तूर, मासे, मेंढीचे मास, अननस, स्ट्राॅबेरी, दही, गरम पाणी, मसालेदार पदार्थ, खारट चवीच्या वस्तू पूर्णपणे वर्ज्य करावेत.
- अतिप्रमाणात व्यायाम, मद्यपान, मैथुन करणे टाळावे.
- वारंवार कोरड, तहान लागणे ही प्राथमिक लक्षणे दिसू लागताच द्राक्षाचा रस, फळे, उसाचा रस, साळीच्या लाह्याचे पाणी वारंवार पिणे आवश्यक असते. खडीसाखर चघळणे, तत्काळ फायदेशीर असते.
- अत्यावश्यक असल्यास उन्हामध्ये छत्री घेऊन बाहेर पडावे. सुती कपडे, चामडी पादत्राणे परिधान करून सुप सरबत इ. द्रव आहार सेवन करूनच उन्हात जावे.
-बऱ्याच व्यक्तींना घोळण फुटणे चक्कर येण्याची सवय असल्यास त्यांनी दुर्वाचा रस किंवा गायीचे तूप नाकात सोडावे. कपाळावर पाण्यामध्ये भिजवलेला कपडा ठेवावा. पायाकडेची बाजू उंच ठेवून आराम करावा.
-अंग गरम असल्यास इतर काळजीसोबत कांद्याचा रस सर्व अंगावर जिरवावा. तळपायाला काश्याच्या वाटीने साजूक तूप घासावे. डोळ्यावर गुलाबजल अथवा दुधाची कापडाची घडी ठेवावी.

-लघवीला जळजळ, अडखळत होणे हा उन्हाळीचा त्रास असणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. संत्र्याच्या रस, नारळपाणी, कोहळ्याचे पाणी, द्राक्षाचा रस पिणे, धने-जिऱ्याचे पाणी वारंवार प्यावे याने उष्णता कमी होऊन लघवीची आग होणे थांबते.
संत्र्याचा रसा सोबत आवळयाचा
रस एक वेळ दररोज घेतल्यास लघवीचे प्रमाण प्राकृत होते असा अनुभव आहे.
-मलावष्टंभ असल्यास दुधाबरोबर लोणी, अंगदुखीसाठी द्राक्षाचा रसाबरोबर खडीसाखर हे मिश्रण गरजेनुसार घ्यावे.

-उन्हामुळे त्वचेवर पुरळ उठल्यास गार पाण्यानो स्नान करून चंदनाचा लेप करावा. घामामुळे त्वचेची रंध्र बंद झाल्याने उटणे लावून स्नान केल्याने ते उघडतात. केस धुण्यासाठी शाम्पू, साबणाऐवजी शिकेकाई, रिठा, संत्रा साल या काढ्याचा उत्तम फायदा होताे.

-अंग कायमच गरम भासत असल्यास दुर्वाचा रस किंवा कांद्याचा रस जिरवावा. उंबर फळाचे पाणी औदुबंरजल खडीसाखरे सोबत प्यावे.
-गुलकंदाचे नियमित सेवन करावे
-दुध लोणी, तूप, हंगामी फळे यासोबत कमलकंदाचे बी-मकाणे, शिंगाडा पीठ, तवकीर याची दूध व तूप घालून केलेली खीर नियमित आहार घेतल्यास पितवृद्धी होत नाही.
-केवळ वरवरचे क्षणिक आनंद देणारे फ्रीजचे पाणी, शीतपेये, आईस्क्रीम यांच्या आनंदाला न भुलता ग्रीष्म ऋतूनुसार नैसर्गिक आहार-विहाराची जीवनशैलीचा अवलंब आयुर्वेदीय तज्ज्ञ व वैद्याच्या मार्गदर्शनाने केल्यास जिवघेणा उष्मा ओकणारा भास्करसुद्धा आरोग्यदायी बनतो.
-चक्कर येत असल्यास गार जमिनीवर झोपावे. वाळ्याच्या पंख्याने वारा घ्यावा. कलिंगड अथवा टरबुजाचा गर अंगाला चोळावा. खजूर व काळ्या मनुका पाण्यामध्ये भिजवून त्याचे सरबत प्यावे म्हणजे थकवा कमी होतो.
वैजकमल आयुवैद वैद्य. राहुल सावंत, आयुर्वेदाचार्य
मोबा.९८२२६४९५४४

Next Article

Recommended