आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nikhil Sakhare Article About Success, Divya Marathi

Divya Education- यशस्वितेच्या वैश्विक सिद्धांतातील एकतेचा सिद्धांत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
the universal laws of success(यशस्वितेच्या वैश्विक सिद्धांत) या विषयावर गेली पाच वर्षे मी संपूर्ण महाराष्‍ट्रात कार्यशाळा घेत आहे. हजारो विद्यार्थ्यांनी व लोकांनी आपलं आयुष्य या सिद्धांतांचा अवलंब करून बदललं आहे, पण वेळेच्या अभावामुळे मी प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांचा फायदा व्हावा या हेतूने आपण 11 सिद्धांताची ओळख करून घेणार आहोत. हे सर्व सिद्धांत आपण सगळेच प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या पाळत असतो, पण त्याचा योग्य उपयोग कसा करून घ्यावा हे आपल्याला माहीत नसते. उदा. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत या ब्रह्मांडाच्या उत्पत्तीपासून अस्तित्वात आहे. प्रत्येक जण तो वापरत होता, पण जेव्हा न्यूटनने त्याचा गणितीय समीकरणात उपयोग केला त्यानंतर विज्ञानाच्या कक्षा कित्येक प्रमाणात उंचावल्या गेल्या.
आज आपण मंगळावर सुरक्षितपणे यान पाठवू शकतो ते फक्त मानवाला हा सिद्धांत ज्ञात आहे म्हणून. आणि हे सिद्धांत असतात कशासाठी? ज्याप्रमाणे आपल्या इच्छित स्थळी सुखरूप पोहोचण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळावे लागतात. त्याप्रमाणे इच्छित यशापर्यंत सुखरूपपणे पोहोचण्यासाठी हे सगळे सिद्धांत पाळावे लागतात, तर हे सिद्धांत कोणते आहेत ते कसे वापरायचे हे आपण पाहणार आहोत. यातील सगळे सिद्धांत एकमेकांशी संबंधित आहेत. हे सर्व अकरा सिद्धांत ज्ञात करून घेणे गरजेचे आहे. यातील पहिला सिद्धांत आहे. 'एकतेचा सिद्धांत' एकता म्हणल्यानंतर सामान्यपणे आपल्या नजरेसमोर वेगवेगळे पैलू आले असतील. जसे की धार्मिक एकता, स्त्री - परुष समानता, सर्व मानवजात एक आहे, इत्यादी. पण याहीपेक्षा वेगळ्या त-हेने आपण सगळे एक आहोत, सगळे म्हणजे सगळेच, सजीव-नर्जीव सगळेच.
ज्ञानेश्वरीत जसा उल्लेख आहे तसंच विज्ञानाने देखील हे सिद्ध केले आहे की प्रत्येक सजीव किंवा निर्जीव वस्तू, मग ती जड, दव्य किंवा वायू कोणत्याही रूपात असो तिच्या आतमध्ये स्पंदने असतात, ऊर्जा असते आणि ही एकाच पद्धतीची ऊर्जा असते फक्त तिचे वरकरणी रूप वेगळे असते. म्हणजेच काय तर आपल्या नजरेस आपल्याला जे काही दिसतं किंवा या सृष्टीत जे काही दृश्य -अदृश्य स्वरूपात अस्तित्वात आहे. त्या सगळ्यांमध्ये एकच ऊर्जा कार्यरत आहे. आपण सगळे एक आहोत, एकमेकांशी जोडलेले आहोत आणि याचा अनुभव आपल्याला पावलोपावली येत असतो.
हे जेवढे वैश्विक सिद्धांत आहेत ते सर्व नैसर्गिक आहेत व ते सर्वांसाठी समान असतात. ते चांगलं - वाईट, लहान - मोठा, गरीब - श्रीमंत या भेदभाव करत नाहीत. उदा. वरून खाली पडणारा व्यक्ती हा चांगला आहे की वाईट हा विचार गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत करत नाही. दोहोंवरही सारखाच परिणाम होतो. तसंच या सिद्धांताचं आहे. आपले इंद्रिय आपल्याला मूळ जग कधीचं दाखवत नाहीत. ते नेहमी आपल्याला फसवत असतात. आपण आपल्या डोळ्याने जे दिसतं तेवढ्यावरच विश्वास ठेवतो, पण या सृष्टीतील प्रत्येक चराचरात असलेलं चैतन्य हे सारखंच आहे. त्यामुळे तेव्हा आपण आयुष्यात असं एखादं ध्येय घेऊन चालतो ज्यात खूप लोकांचा फायदा आहे, तेव्हा हे सिद्धांत आपल्याला यश मिळविण्यास मदत करतात. का धीरूभाई अंबानींनाच एवढं यश मिळालं? का बिल गेट्सच सर्वात श्रीमंत झाला? या दोघांकडेही कौटुंबिक पार्श्वभूमी तशी नव्हती तरीही यांनाच यश का मिळालं? तर जेव्हा धीरूभार्इंनी व्यवसायाची सुरुवात केली तेव्हा ते म्हणाले होते, ‘मै आगे बढूंगा, मेरे साथ पुरा देश आगे बढेगा’, बिल गेट्सने जेव्हा कंपनी सुरू केली तेव्हा त्याचं स्वप्न होतं, जगातल्या प्रत्येक डेस्कवर मी कॉम्प्युटर पोहोचवेल. या दोघांचा उद्देश जास्तीत जास्त लोकांना फायदा मिळवून देणारा होता. म्हणून त्यांना एवढं यश मिळालं.
तेव्हा तुम्ही देखील जेव्हा खूप लोकांचा फायदा होईल, असा काही उद्देश ठेवाल, तेव्हाच तुम्हाला देखील हे सिद्धांत मदत करतील. आणि जर असं काही केलंत, ज्याने लोकांचं नुकसान होईल, तेव्हा हा सिद्धांत तुमचं काहीतरी नुकसान करतो, पण माझी सर्व वाचकांना एक विनंती आहे. सर्व अकरा सिद्धांत जाणून घेईपर्यंत त्याला अमलात आणायचा प्रयत्न करू नका.