आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्री आठवडे बाजाराशी!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक गावात आठवडे बाजार असतोच! तसाच अौरंगाबादमधेही भरतो. तसं मी आधी जात नव्हते बाजारात. कधी दारावर, कधी येता जाता अशाच भाज्या घ्यायचे. पण मुलं थोडी मोठी झाली, स्वतःची कामं स्वतः करायला लागली त्यामुळे थोडा वेळ मिळाल्यामुळे आठवडे बाजारात जाणं सुरू झालं. एकदा-दोनदा गेल्यावर आठवडे बाजारात जाणं म्हणजे जणू छंदच झाला. घरातले काम पण होते भाजी आणण्याचे आणि मुख्य म्हणजे ओळखीचे बरेच लोक भेटण्याची ती एक जागाच झाली असे वाटते. अचानक भेटलेल्या मैत्रिणी, आणि मग खूप गप्पा! म्हणजे स्वतः साठी आणि घरासाठी एकाच्या ठिकाणी दोन तास दिले जातात. आणि आणलेल्या भाज्यांमधून नवनवीन पाककृती करून पाहण्याचा आगळाच छंद तोही पूर्ण होतो. कधीतरी अचानक लहानपणी माहेरी राहत असलेल्या शेजारच्या काकूही त्यांची मुलं या ठिकाणी राहायला आल्यामुळे भेटतात, त्यांना भेटल्याचा आनंद निराळाच असतो. मला तर कधी एखादे-दोन सोमवार बाजारात गेले नाही तर करमत नाही. कारण इतर मैत्रिणी तर भेटतातच परंतु त्या भाजी विकणाऱ्याही मैत्रिणी झाल्यासारख्या वाटतात. त्या त्यांच्या जागेवर भाजी विकायला दिसल्या नाहीत तर चुकल्यासारखे वाटते कारण त्याही मैत्रिणीसारख्या दर सोमवारी भेटतात आवर्जून. आपण गेलो नाही तर पुढच्या सोमवारी विचारतात, ताई, मागच्या सोमवारी दिसल्या नाही तुम्ही!
बातम्या आणखी आहेत...