आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...नंतर मराठी भाषा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आधी बोली नंतर प्रमाण भाषा तयार होते मराठी बोली ही ठराविक जनसमूहाची नाही. अनेकांकडून ती बोलली जात असल्याने समाजमान्य बोली आहे. त्या जनसमूहाच्या जगण्याच्या संघर्षातून अनेक बोल्या निर्माण होतात. तशीच मराठी बोली निर्माण झालेली आहे. डॉ. ना. गो. पालेरकर यांच्या मतानुसार अहिराणी मराठीची पोटभाषा आहे. प्रत्येक भाषेमधील शब्द प्रत्येक भाषेत पेरले गेले आहेत. अभिजात याचा अर्थच भाषेची प्राचीनता. मराठी बोली बोलणार्‍यांची प्राचीनता आहे. आधी बोली नंतर प्रमाण भाषा तयार होते. यादवकालीन मराठी भाषेचा अपभ्रंश भाषेच्या जवळची भाषा आहे. ही भाषेच्या क्रमवारीत सुरुवातीला संस्कृत, नंतर प्राकृत आणि मग अपभ्रंश नंतर मराठी भाषा असा आहे. यावरूनच अभिजातची गुणवत्ता सिद्ध होत असते. आजही अनेक जणांकडून मराठी भाषा बोलली जाते. साधारणपणे यादवाच्या काळात मराठी ही बोली भाषा असल्याचे काही दाखले उपलब्ध होतात.

चक्रधर स्वामींच्या लीळापासून सुरुवात
भारतात संत, ऋषीमुनी यांनी संतवाङ्मय लिहून ठेवले म्हणून मराठी साहित्य जन्माला आले, परंतु खर्‍या अर्थाने चक्रधर स्वामींच्या लीळापासून साहित्याला सुरुवात झालेली आहे. मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी मराठी हा केद्रबिंदू महत्त्वाचा ठरेल. बोली हादेखील केंद्रबिंदू असला पाहिजे.

मराठी साहित्य जतनासाठी अनुवादावर भर पाहिजे
मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी नवोदित लेखकांना प्रोत्साहन देऊन साहित्य अनुवाद या गटाकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. मराठीत जे काही संतवाङ्मय, साहित्य निर्माण झाले आहे. त्याचा जास्तीत जास्त प्रसार, प्रचार होण्यासाठी या साहित्यांचे इतरही भाषेत अनुवाद झाले पाहिजे. जोपर्यंत मराठी साहित्याचे इतर भाषेत अनुवाद होऊन ते इतरांपर्यंत वितरीत होत नाही. तोपर्यंत खर्‍या अर्थाने मराठीचे जतन होणार नाही. आज हिंदी साहित्य मोठ्या प्रमाणावर इंग्रजीत अनुवादित होते. त्याचप्रमाणे इंग्रजी साहित्यही हिंदीसह इतरही भारतीय भाषेत अनुवादित होत असते. त्यातून आपल्याला इंग्रजाच्या संस्कृती, व्यवहार यासह इतरही गोष्टी समजतात. भाषेला जात, धर्म, पंथ नसतो, कोणताही माणूस कोणतीही भाषा बोलू शकतो. म्हणून भाषेला ‘आई’ ची उपमा शोभते. मराठी भाषेत विपुल साहित्य निर्मिती सातत्याने होत असते, परंतु ती केवळ मराठी भाषकांपुरती मर्यादित राहते. हिंदी, इंग्रजी आणि इतरही भाषेत अनुवाद झाले पाहिजे. त्याकडे फारसे कोणीही लक्ष देत नाहीत. मराठी साहित्याचे जास्तीत जास्त अनुवाद होण्यासाठी नवोदितांना प्रोत्साहन दिले गेले पाहिजे.

तंत्रज्ञानामुळे कोणतीही भाषा मरत नाही
तंत्रज्ञानामुळे कोणतीही भाषा नष्ट होत नाही. कारण कोणतीही भाषा ही समाजाने स्वीकारलेली असते. तिला समाजमान्यता असते. जोपर्यंत राज्यात मराठी माणसाची कुटुंबव्यवस्था कायम आहे. तोपर्यंत भाषेला भय नाही. संगणक, मोबाइल, फ्रिज, टीव्ही ही इंग्रजी नावे धारण केलेली यंत्रे जरी मराठी भाषकाच्या हाती असली तरी त्या यंत्राचा वापर इंग्रजी भाषेसह मराठी भाषेसाठीही आहे. म्हणून मोबाइलवर मराठीत एसएमएस करू शकतो. इंटरनेटच्या माध्यमातून मराठी भाषा सातासमु्रदापार गेली आहे. तंत्रज्ञानामुळे मराठी भाषेवर इंग्रजीचे आक्रमण होण्याची भीतीही अशाच प्रकारची निराधार आहे. आजची पिढी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतात. त्यामुळे ते इंग्रजीत फटाफट बोलतात. त्यामुळे ते इंग्रजीचे पोपट होऊन मराठी संस्कृती हरवून बसतील ही भीतीही मनात न बाळगता मनाचे श्लोक हा संस्कार बालकावर आहे.