आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दमा, अ‍ॅलर्जी : उपचार, व्यायाम प्रभावी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आकाश ढगाळून आलं किंवा हवेत गारठा वाढला की दमेकरी लोकांना अक्षरश: देव आठवू लागतो. त्यांना दम लागायला लागतो. खोकून खोकून दमा असलेल्या व्यक्तीच्या छातीत भाता फुटतोय की काय असे वाटायला लागते. लहान मुलांपासून वृद्धापर्यंत हा दमा त्रास देत असतो. मात्र वृद्धापकाळात त्याचे जास्त प्रताप िदसायला लागतात. अनेक वृद्धांना या दम्यामुळे जीव नकोसा होत असतो. हा दमा आता काही बरा होणार नाही, तो आपल्याला घेऊनच जाणार आहे. अशी भावना त्यांच्यात निर्माण झालेली असते, पण आधुनिक पद्धतीने योग्य वेळी उपचार व विशिष्ट प्रकारचा व्यायाम. यामुळे ह्या दम्याचा प्रभाव कमी करता येतो. त्यावर नियंत्रण ठेवता येते.
वल्मनरी फंक्शन टेस्ट, फूड, ड्रग, स्कनि टेस्ट, रेस्पीरेटरी अ‍ॅलर्जी व आयजीई लेवल परीक्षण, इम्बुनोथेरपी, चेस्ट फिजकिल थेरपी या अशा प्रकारच्या अत्याधुनिक कॉम्प्युटराईज्ड पद्धतीमुळे दम्यासारख्या रोगाची, तो कशामुळे मला झाला कोणत्या अवस्थेत आहे. कोणत्या प्रकारचा आहे. याची संपूर्ण माहिती मिळते. योग्य औषधोपचार अगदी सहज करता येतो.
दमा केवळ आनुवंशकिच असतो असे नाही तर त्याची इतरही कारणे असू शकतात. अ‍ॅलर्जी हे आणखी महत्त्वाचे कारण आहे. अ‍ॅलर्जी ही साधरणत: धूळ, अन्न, वनस्पतीचे परागकण यापासून होत असते. अ‍ॅलर्जी असलेल्या माणसामध्ये एक विशिष्ट प्रकारची अ‍ॅन्टीबॉडी निर्माण होते. त्याला इम्युनोग्लोबनि म्हणतात. अ‍ॅलर्जीन्स व आटूजीई यामध्ये प्रतकि्रिया निर्माण होऊन हिस्टमनि नावाचा पदार्थ निर्माण होतो आणि हेच हिस्टामिन रोग्यामध्ये अ‍ॅलर्जीची लक्षणे निर्माण करते.
उपचार -
१. प्राण्यांचा संबंध टाळावा. हा प्राण्यांच्या केसापासून बनवलेले स्वेटर्स, ब्लँकेट, कार्पेट इत्यादी वापरू नये. धुळीपासून दूर राहावे.
२. शास्त्रोक्त पद्धतीने व डाॅक्टरांच्या सल्ल्याने छातीचा व्यायाम करावा.
३. रात्री जेवण लवकर करावे. अ‍ॅलर्जी येणाऱ्या पदार्थापासून दूर राहावे.
अानुवंशकि दमा व अ‍ॅलर्जीपासून आलेला दमा यात फरक जाणवतो. अ‍ॅलर्जीमुळे फुप्फुसात घुसमटल्यासारखे वाटते, तर श्वास घेता येऊ न शकणे, घाम फुटणे, प्राणवायूच्या अभावामुळे चेहरा काळा पडणे असा प्रकार िदसतो. मनििटापासून ते काही तासांपर्यंत हा अटॅक राहू शकतो.

या आजारात आपण पुढील काळजी घ्यावी
१. सकाळी दीर्घश्वसन करून प्राणायाम करावा.
२. दमा रुग्णांनी जास्त पाणी घ्यावे.
३. पाण्याची वाफ घ्यावी ई. ४. वल्मनरी फंक्शन टेस्ट, फूड, ड्रग, स्कनि टेस्ट करावी.