आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

त्वचा आणि ओठांच्या रंगासाठी डाळिंबाचे करा हे सोपे उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फळांचे नियमित सेवन केवळ आरोग्यच नव्हे, तर सौंदर्य वर्धनासही उपयुक्त ठरते. आवडणारी तीच ती फळे खाण्याऐवजी आलटून पालटून खावीत. उपवासाच्या दिवशी तर फलाहारच करावा. यामुळे पचनास मदत होते तसेच अपचन, गॅसेसमुळे पोटाचा होणारा त्रास टळतो.

डाळिंब
मधुर, रसाळ असे डाळिंबाचे दाणे सकाळी उठल्यावर चावून खावेत. त्यामुळे कोठा साफ राहतो. पोटात जंत असतील तर तेदेखील पडतात. पोट साफ असल्याने त्वचाही आपोआप उजळते. पकिलेल्या डाळिंबाचे दाणे चेहऱ्यावर नियमितपणे चोळा, त्वचेचा रंग हलका व काहीसा गुलाबी होण्यास मदत होईल. याचा प्रयोग ओठांवरही करावा. ओठांचा रंग सुधारेल. चेहऱ्यावरील डाग आणि झाकोळलेपणा घालवणि्यासाठी डाळिंबांची स्वच्छ धुतलेली साल कच्च्या दुधात वाटा व चेहरा मान, गळा यावर लेपा, वाळल्यावर धुवा.