आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोपेची समस्या : शांत झोप वाढवते कार्यक्षमता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनुष्याला ज्याप्रमाणे चांगली भूक लागणे, तहान लागणे, शौचास साफ होणे त्याप्रमाणेच नितांत आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे झोप येणे, जेवढी झोप चांगली लागेल तेवढीच मनुष्याची काम करण्याची इच्छा वाढीस लागेल व मन प्रसन्न होऊन कामामध्ये मन लागेल. मनुष्याला झोप येत नाही यासाठी औषध उपचार तर आहेतच शिवाय ज्या व्यक्तींना खूप झोप येते यासाठीदेखील होमिओपॅथीमध्ये चांगले औषधोपचार आहेत, परंतु काही कारणास्तव बर्‍याच व्यक्तींना झोप येत नाही किंवा पुरेशी झोप होत नाही. अशा प्रकारचे अनेक रुग्ण माझ्याकडे औषधोपचाराकरिता येत असतात. झोप पुरेशी न झाल्याने बर्‍याच व्यक्तींना
1) डोळ्यांमध्ये जळजळ होणे, पाणी वाहणे. 2) संपूर्ण अंगदुखी होणे, आखडल्यासारखे वाटणे. 3) मळमळ करणे, ओकारी होणे. 4) अंग पेटल्यासारखे वाटणे. 5) पोट साफ न होणे, आंबट ढेकर येणे. 6) केस गळणे, पिंपल्स येणे व इतर लक्षणांकरिता अशा प्रकारची अनेक लक्षणे रात्रपाळी काम करणार्‍यांमध्ये, प्रवासामुळे अनियमितता तसेच ज्यांना वेळेलाच झोप घ्यावी लागते अशांना व ज्या व्यक्तींना निद्रानाश झाला असेल अशा व्यक्तींना दिसून येतात. निद्रानाश होण्याचे अनेक कारणे असू शकतात. 6) बर्‍याच व्यक्तींना स्वप्नदोष, रात्री स्वप्न पडत असल्याने झोप न होणे. 7) घरात थोडा देखील आवाज झाला की, झोप न होणे. 8) झोपेत भीती वाटणे, झोपेत बडबड करणे, झोपेत चालणे, घोरणे. 9) लहान-लहान गोष्टींची चिंता वाटणे. 10) बिछान्यात लघवी होणे.
होमिओपॅथीत झोप न येणे म्हणजेच निद्रानाश याकरिता औषधोपचार तर आहेच शिवाय ज्या व्यक्तींना जास्त झोप येते याकरिता देखील चांगली औषधे आहेत, परंतु हा औषधोपचार आपल्या मनाने न घेता होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच उपचार करावा. कारण याकरिता लागणारा डोस व प्रमाणाची (पॉटेन्सी) अभ्यास करून ठरवली जातात.
होमिओपॅथिक उपचार
आरसेनिक, कॉफिया, नक्स हेमिका, पलसेटिला, सल्फर, सिफिलिनम, ओपियम,
थुजा. रस टॉक्स, होसोसायमस, फॉस्फरस या व अधिक औषधी आहेत. त्यापैकी
अ) आरसेनिक अल्बम : - हे औषध ज्या व्यक्तीला झोपताना चोरांची भीती वाटणे व झोपताना असुरक्षितपणा वाटणे व सतत चिंता वाटणे यासाठी गुणकारी ठरेल.
ब) कॉफिया क्रुडा : - अती विचार करणे, झोपताना मन शांत नसणे, थोडादेखील आवाज झाला तर झोप खराब होण्याकरिता गुणकारी ठरेल.
क) नक्स होमिका : - मनामध्ये सतत व्यावसायिक विचारांचे जाळे व नफ्या-तोट्यांची भीती वाटणे, यामुळे निद्रानाश होणे यासाठी हे औषध विशेष गुणकारी ठरते.
ड) पेलसेटिका : - झोपताना भीती वाटणे, नवीन जागेवर झोप न येणे, चक्कर येणे, तोंडाला कोरड पडणे, मुख्यत: गरोदर स्त्रियांना या विकारासाठी गुणकारी.
इ) सल्फर : - कुटुंबाची, मुलांची सतत काळजी असणे, अपघाताची सतत भीती वाटणे, आत्मविश्वास कमी होणे, झोपताना खाज सुटणे, अती घाम जाणे, डोळ्यांची आग होणे व पाणी येणे, याकरिता गुणकारी औषध आहे. वरील औषधोपचार आपल्या होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच घ्यावा.
काही व्यक्तींना अतिशय झोप येण्यावर देखील होमिओपॅथीमध्ये चांगली औषधे आहेत.

पुढील स्लाइडमध्ये, झोपताना काय काळजी घ्यावी..