आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फलाहार करा, निरोगी राहा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुस्तकाच्या नावावरूनच काय तो बोध होतो वेगळ सांगण्याची गरज नाही. मात्र कुठले फळ नेमके काय आहे, कसे ते आहाराच्या दृष्टीने योग्य आहे हे तांत्रिक व आरोग्यदृष्ट्या विवेचन आहे. अनुभवी आहारतज्ज्ञ असूनही साध्या सोप्या भाषेत हे पुस्तक लिहिलेले आहे. सरळ साधे कुठलेही अवडंबर न पाळता (प्रस्तावना नाही) लिहिलेले पुस्तक असेही याचे वर्णन होईल. फळांच सुंदर मुखपृष्ठ असलेले पुस्तक कोणालाही हातात घ्यावेसे वाटते. रसिका देशमुख यांच्या मते भारत हा एवढा सुपीक, समृद्ध, संपन्न देश आहे.
फळांच्या उपलब्धतेसाठी कुठे पाहायची गरजच नाही. एकंदरीतच आदर्श जीवनशैलीसाठी यांचा दैनंदिन वापर करणे हितावह आहे. शिवाय फलाहाराचे फायदेही भरपूर आहेत. ते आजारांना चार हात दूर ठेवणारे आहेत किंवा जर कुणाला काही कारणांनी आजार झालाच तर त्यातून लवकर बरं होण्याकरिता किंवा ऑपरेशनपूर्वी आणि ऑपरेशननंतरही रुग्णाला उदरभरणासाठी फळं दिलासा ठरतात. तेव्हा या पुस्तकात आपण फळांची माहिती, औषधी उपयोग, त्यातील जीवनसत्त्व आणि खनिजाचं
प्रमाण तसेच शेवटी फळांच्या वेगवेगळ्या पाककृती पाहणार आहोत.
पुस्तकातील अनुक्रमणिकेवर नजर टाकल्यास 29 फळांची प्रकरणे यात आहेत. समजा ती सर्व फळे आपण नियमित खाल्ली तर आपली प्रतिकारक्षमता तर वाढेलच, आपल्याला प्रसन्न वाटेल, अंगकांती तुकतुकीत होईल, पचनाची समस्या दूर होईल. थोडक्यात आरोग्य सुधारेल. आवळा, कैरी, आलुबुखार-प्लम, नाशपाती, स्ट्रॉबेरी, डाळिंब, टरबूज-खरबूज, जांभूळ, फणस, द्राक्ष, बोर, अननस, सीताफळ, चिकू, आंबा, पपई, केळी, सफरचंद, पेरू, लिंबू, अंजीर, बदाम, खजूर आणि खारका, नारळ, अक्रोड, पिस्ते, टोमॅटो, मोसंबी आणि संत्री.
प्रत्येक फळाच्या या प्रकरणात आकृती आणि तक्ता दिलेला आहे. फळांबाबत आपण नियमित सेवन केल्यास खर्‍या अर्थाने आपल्याला फलं प्राप्ती होईल यात शंका नाही.
फलाहार करा, निरोगी राहा
पुस्तकाचे नाव - फलाहार करा, निरोगी राहा
लेखिका - प्रा. रसिका वि. देशमुख
प्रकाशन - साकेत प्रकाशन, पुणे-औरंगाबाद
पृष्ठसंख्या - 96, मूल्य - 60 रुपये