आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वर्षांपासूनचा हायपोथाईरोइडिसम सहा महिन्यांतच झाला बरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुर्धर आजारावर अशी केली मात
मी शालिनी पाटील एका खूप भयानक परिस्थितीतून फक्त होमिओपॅथिक उपचारानेच बाहेर आले. माझा हायपोथाईरोइडिसम व हायपरथाईरोइडिसम हा आजार आदलून बदलून मला त्रास देत होता. अशा परिस्थितीत अनेक डॉक्टरांकडे उपचार केले, परंतु हायपोथाईरोइडिसमसाठी उपचार सुरू केले की, त्याचा दुष्परिणाम होऊन हायपरथाईरोइडिसम होत असे आणि उपचार बंद केला किंवा कमीत कमी डोसच्या गोळ्या घेतल्या तरी लगेच हायपोथाईरोइडिसमचा त्रास होत असे. डॉक्टरांना विचारले तेव्हा ते म्हटले की तुम्हाला औषध आयुष्यभर घ्यावे लागेल. या सर्व त्रासाला मी कंटाळले होते व मी माझ्या भावाला याबद्दल सांगितले. त्याने मला होमिओपॅथिक औषधी घेण्यास सांगितले. कारण तो स्वत:च्या आजारासाठी होमिओपॅथिक औषधी घ्यायचा व त्याचा आजार बराच कमी झाला होता. होमिओपॅथिक औषधोपचार सुरू करण्यापूर्वी सुरुवातीला मला पायर्‍या चढल्या किंवा थोडे जरी चालले तरीही दम लागायचा, घाम यायचा, अस्वस्थ वाटायचे. खूप लवकर थकवा यायचा. झोपून राहावे वाटायचे आणि हळूहळू वजन वाढत होते. त्यासाठी मी डॉक्टरांना दाखवले व औषधोपचार सुरू केले. डॉक्टरांनी लघवी आणि रक्त तपासणी करून हायपोथाईरोइडिसम असे रोगनिदान करून औषधोपचार सुरू केले. सुरुवातीला मला खूप चांगला फरक पडला होता, परंतु गेल्या सहा महिन्यांपूर्र्वी मला धडधड होणे, पायांची थरथर होणे, धाप लागणे, दम लागणे, वजन एकसारखे वाढत जाणे, घाबरल्यासारखे होणे हा त्रास सुरू झाला. सुरुवातीला माझ्या रक्त-तपासणीमधील टी.एस.एच.चे प्रमाण नॉर्मलपेक्षाही कमी (0.118) झाले होते की, ज्याला हायपरथाईरोइडिसम असे म्हणतात. इतर औषधाने हायपोथाईरोइडिसमचे रूपांतर हायपरथाईरोइडिसममध्ये झाले. याचा अर्थ एक आजार कमी व त्याच्या अगदी विरुद्ध आजार सुरू झाला. नंतर सहा महिन्यांअगोदर टी.एस.एच.चे प्रमाण 125 (नॉर्मल = 0.3 ते 5.5 एवढे असते) एवढे होते.
होमिओपॅथिक डॉक्टरांनी मला होमिओपॅथीचे औषध सुरू केले व त्याचबरोबर इतर औषधी कमी घ्यायला सांगितल्या. एक महिन्यानंतर इतर औषधी कमी करत गेलो आणि होमिओपॅथिक औषधी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अगदी नियमित घेत गेलो. औषधोपचार सुरू केल्यानंतर एका महिन्याच्या आत माझा त्रास बर्‍यापैकी कमी झाला. अगदी सहा महिन्यांतच माझा सर्व त्रास पूर्णपणे बरा झाला. सहा महिन्यांनंतर टी.एस.एच.चे प्रमाण 2.38 झाले होते, की जे नॉर्मल आहे. नंतर परत तीन महिन्यांनंतर आणखी एकदा थायरोइडची तपासणी केली तेव्हाही नॉर्मल होती. गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून माझ्या गोळ्या बंद असूनदेखील माझे सर्व रक्ताचे रिपोर्ट पूर्ण नॉर्मल आहेत. मी होमिओपॅथीची खूप खूप आभारी आहे आणि असे सांगू इच्छिते की, आपण देखील अशा आजारापासून होमिओपॅथीच्या मदतीने पूर्णपणे बरे होऊ शकता.

सौ. शालिनी पाबळे (पाटील), औरंगाबाद. मोबाइल नं. 9404292665.