आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्याहारीमध्ये हवी प्रथिने-तंतू, जीवनसत्त्व आणि खनिजतत्त्व

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या दिवसाची सुरुवात आनंदी विचाराने व आरोग्यदायी व्हावी, अशी आपली सर्वांची इच्छा असते. आपले कुशलक्षेम दर्शवणार्‍या आपल्या आरोग्यावर आपण खात असलेल्या अन्नाचा प्रभाव पडतो. न्याहारी म्हणजे दिवसाचे पहिले मुख्य जेवण असल्यामुळे आहारविषयक नियमामध्ये त्याचे अत्यंत महत्त्व असते.
72 टक्के भारतीय अपूर्ण न्याहारी घेतात : वर्षानुवर्षे लोक आरोग्यदायी धान्य किंवा अन्नाचा समावेश असलेली न्याहारी घेत आले आहेत. धान्य म्हणजे संतुलित न्याहारीचे अविभाज्य अंग आहे. ‘इंडिया ब्रेक फास्ट हॅबिट्स स्टडी’ (न्याहारी करण्याच्या भारतीय सवयी) द्वारे असे निदर्शनास आले आहे की मोठ्या संख्येत म्हणजे 72 टक्के भारतीय अपूर्ण न्याहारी घेतात. (पोषणच्या दृष्टीने अपुरी न्याहारी). 4 पैकी 1 भारतीय प्रामुख्याने वेळ नाही आणि भूक नाही अशा कारणांचा हवाला देत न्याहारी करण्याचे टाळतात.
संतुलित आहारामध्ये किमान तीन अन्न गटातील खाद्यपदार्थ असायला हवे : संतुलित न्याहारीचे महत्त्व या ना त्या मार्गाने कमी होताना दिसत आहे. संतुलित न्याहारी म्हणजे आरोग्यदायी खाण्याच्या कोणत्याही प्रयत्नाचा महत्त्वाचा भाग आहे. संतुलित न्याहारी घेण्याची सवय दीर्घकाळापर्यंत पुरेसे पोषण मिळवून देऊ शकते. पोषण तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, न्याहारीमध्ये ऊर्जेशिवाय प्रथिने, तंतू, जीवनसत्त्व व खनिजे यासारखी पोषक तत्त्व असायला हवी. संतुलित आहारामध्ये किमान तीन अन्न गटातील खाद्यपदार्थ असायला हवे. उदा. पूर्ण धान्य किंवा अन्न गटातील एक पदार्थ, दूध किंवा दही गटातील एक पदार्थ व फळ किंवा भाजी गटातील एक पदार्थ.
तृणधान्य म्हणजे न्याहारीच्या पदार्थांमधील एक चांगली निवड : संतुलित न्याहारी जशी महत्त्वाची असते तसेच तृण धान्य म्हणजे न्याहारीच्या पदार्थांमधील एक चांगली निवड आहे. हे तुम्हाला माहीत होते का? ‘इंडिया ब्रेकफास्ट हॅबिट स्टडी’ने सुद्धा यावर भर दिला आहे की, तृणधान्य (धान्य) ही अजूनही भारतीय न्याहारीतील प्रमुख भाग असतात. 75 टक्के लहान मुले व 73 टक्के मोठी माणसे तृणधान्यांना न्याहारीसाठी उत्तम पर्याय समजतात. संशोधनाद्वारे असे दिसून येते की, न्याहारीमध्ये तृणधान्य खाणार्‍यांचे शारीरिक वजन योग्य निरोगी असते. चांगल्या प्रमाणात पोषण त्यांना मिळते. आजाराचा धोका कमी असतो आणि सर्वसाधारणपणे आरोग्यामध्ये सुधारणा होते.
न्याहारीमध्ये कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे यासारखी पोषक तत्त्व असायला हवी : ‘न्याहारी म्हणजे दिवसाचा सर्वात महत्त्वाचा आहार असतो व प्रत्येकाने दररोज सकाळी संतुलित पोषणाने भरपूर अशी न्याहारी घेतली पाहिजे. आदर्शत: न्याहारीमध्ये अशा प्रकारचे अन्नपदार्थ असले पाहिजेत ज्यामध्ये कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे यासारखी पोषक तत्त्व असायला हवी. ज्यामुळे तुमची भूक भागेल व त्यानंतरच्या आहारापर्यंत पुरेल एवढे आवश्यक पोषण तुम्हाला मिळेल. मेदामुळे जेवणाची चव सुधारते. मात्र, त्याची मात्रा न्याहारीच्या पदार्थांमध्ये दररोज एक चहाच्या चमच्यापेक्षा जास्त नसावी.’ ब्रिच कँडी हॉस्पिटलच्या आहारशास्त्र विभागप्रमुख, मिस. एलीन कँडे म्हणतात.
नियमित न्याहारी केल्यामुळे आरोग्यास लाभ होतो : अभ्यासाद्वारे असे निदर्शनास आले आहे की, सर्व वयोगटांमध्ये विशेषत: मुले व वयात येणारी मुले यांच्यामध्ये नियमित न्याहारी केल्यामुळे आरोग्यास लाभ होतो. नुकत्याच घेण्यात आलेल्या अभ्यासानुसार, नियमित न्याहारी घेण्याने पोषणविषयक व सामाजिक लाभ तर होतात, पण ज्ञानातही भर पडते. लहान मुलांमध्ये नियमित न्याहारी घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
दीर्घकाळ न्याहारी न केल्याने हृदय व चयापचयसंबंधी आरोग्यावर घातक परिणाम होतात : जेथे पोषणाने भरपूर व संतुलित न्याहारीमुळे आरोग्याचे अनेक लाभ होतात. तसेच हे पहिले मुख्य जेवण टाळण्याने अनेक अप्रत्यक्ष परिणाम होतात. अभ्यास अहवालानुसार दीर्घकाळ न्याहारी न केल्याने हृदय व चयापचयसंबंधी आरोग्यावर घातक परिणाम होतात व न्याहारी घेण्याच्या लाभाचे प्रचालन करणे हा सोपा व महत्त्वाचा सार्वजनिक आरोग्य संदेश ठरू शकतो.