आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कटू आठवणी विसरायला शिकले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवरचना विद्यालयात मी गेल्या २१ वर्षांपासून अध्यापन करत आहे. बीएडला असतानाच पक्कं माझ्या मनात बसलं ते म्हणजे आपण आयुष्यभर विद्यार्थी असतो. कळत नकळत सतत शिकत असतो. माझ्या शिक्षकी पेशात शिकायला खूप मिळालं. कधी वरिष्ठांकडून, सहकाऱ्यांकडून. पण सर्वात जास्त शिकले ते विद्यार्थ्यांकडून. शाळेत तेव्हा खूपसे विद्यार्थी आनंदवल्ली, कामगारनगर भागातले होते, त्यांची घरची परिस्थिती बेताची. नव्या अनुभवांच्या प्रकाशाने माझ्याही मनाचा कोपरा उजळून गेला. कमालीची गरिबी असली तरी मुलांची व पालकांची शिक्षण घेण्याची तगमग मी अनुभवली आहे. आईवडील अज्ञानी असू देत, माझं पोरगं शिकलं पाहिजे, त्याला मारलं तरी चालेल, अशी इच्छा असते. शिक्षणासाठी परिस्थिती अडसर होत नाही हे नक्की. खडतर वाट तुडवून िजद्दीने शिकणाऱ्या मुलांसाठी काही करण्याची ऊर्मी िनर्माण झाली.

वत्सल, वसतिगृहातील मुलगी, आदविासी पाड्यातील. दोन-तीन दविस शाळेत आली नाही म्हणून काळजी वाटली. एक दविस आईला घेऊन शाळेत आली तेव्हा रडतच माझ्या गळ्यात पडली. ितच्या शेतावरच्या घराला आग लागली. सारं काही उद्ध्वस्त झालं. सातवीचा तो वर्ग. सर्वांना कळलं तेव्हा साऱ्यांनाच धक्का बसला. मी विचारात पडले. आपण सर्वांनी तिला मदत करूया का, या एका मुलीच्या प्रश्नाने मी स्फूर्तीने उभी राहिले. कोणी आठ आणे, कोणी रुपया, असे जवळजवळ साडेचारशे रुपये तेव्हा जमा केले. अनेकांनी चादरी, पांघरुणं, भांडी जमा करून वत्सलच्या कुटुंबाची गरज भागवली. ही गोष्ट १५ वर्षांपूर्वीची, पण द्यायचं ठरवलं तर कुठल्याही परिस्थतीत भरभरून देता येतं हे त्या वेळी मुलांकडनंच शिकले.

वर्गातील वात्रट, अस्थिर मुलांचा नेहमीच प्रश्न असतो. त्यांचं अभ्यासात लक्ष नसतं. त्यांना कुणाचं ऐकायचं नसतं. पालकही वैतागलेलेच असतात. त्यांच्यासाठी काय करावं, असा विचार करत होतो. मी िन पुष्पाने ठरवलं, की शाळेतली अशी मुलं एकत्र करून मुक्कामी त्यांचं शिबिर घेऊया. हेतू हाच की त्यांच्या मनाचा ठाव घ्यावा. आविष्कार या नावाखाली दोन दविस या मुलांच्या संपर्कात होते. हा खूप छान अनुभव होता. अशाही मुलांना काही म्हणायचं असतं, हे पालकांनी व शिक्षकांनी जाणावं, हे मला कळलं. या मुलांना शिकवताना कधी वेळप्रसंगी आपल्याला कठोर व्हावं लागतं, एखादा फटका मारला जातो, कळत नकळत तो विद्यार्थी आपल्याकडून अपमािनत होतो तेव्हा वाईट वाटतं. पण मुलांना शिस्त लागावी, अभ्यास करावा, त्यांनी एकाग्र व्हावं, चांगलं वागावं हाच हेतू असतो. शाळेबाहेर गेल्यानंतर वेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालेली अनेक मुलं मी आजही बघते. कधी ही मुलं भेटायला येतात, भेटतात तेव्हा ते सारं रागावणं, मार वगैरे विसरलेली असतात. बाई भेटल्या की त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो तो आनंद, अगदी भरभरून ओसंडणारा. आपल्या चांगल्यासाठी रागावलेल्या बाई केव्हाच विसरलेली असतात ती. अशा कटू आठवणी विसरायला हव्यात, हे शिकले मी मुलांकडून.
- शिक्षिका, नवरचना विद्यालय

nsashtaputre@gmail.com