आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळ्याची खादाडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पावसाळ्यात आपल्या सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ म्हणजे गरमागरम सूप्स, कांदा भजी, बटाटेवडे, सामोसे. त्यासोबत मसाला चाय तर हवीच. पण कधी कधी एकदम हटके खावेसे वाटते, त्याच त्याच पदार्थांचा कंटाळा येतो. म्हणून घरी करता येतील, थोडे वेगळे पण करायला सोपे असे काही पदार्थ आज आपण बघू या.

तंदुरी आलू
घटक : २० छोटे बटाटे, वाटीभर घट्ट दही, अर्धा वाटी बेसन, आलं लसणाची पेस्ट, २ चमचे लाल तिखट, १ चमचा धने जिरं पूड, चवीनुसार मीठ, अर्ध्या लिंबाचा रस, शॅलो फ्रायसाठी ३ चमचे तेल, सजावटीकरता काजूचे तुकडे, कोथिंबीर. तंदूर इफेक्टसाठी एक कोळसा आणि अर्धा चमचा तेल.
कृती : बटाटा कुकरला एक शिट्टी करून अर्धवट शिजवून घ्यावा. दह्यामध्ये सगळे मसाले नीट मिसळून घ्यावे. दह्याच्या मिश्रणामध्ये बटाटे घालावे. एक तास फ्रिजमध्ये मुरवत ठेवावे. तासाभरानंतर फ्राइंग पॅनमध्ये तेल घालून बटाटे फ्राय करावे. फ्राय झाल्यावर तंदूर इफेक्टसाठी कोळसा गॅसवर लाल होईपर्यंत गरम करावा. सगळे बटाटे एका कढईत ठेवून मधोमध वाटीत कोळसा ठेवून त्यावर तेल सोडावे. लगेच झाकण ठेवून १० मिनिटं धूर द्यावा. सर्व्ह करताना तळलेले काजू, कोथिंबिरीने सजवून द्यावे. आवडत असल्यास ह्यासोबत तव्यावर परतलेल्या भाज्याही घालू शकता.
nitishasmart1983@gmail.com
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, आणखी काही खास पदार्थां विषयी... जे तुम्हाला नेहमी-नेहमी चाखावेसे वाटती...
बातम्या आणखी आहेत...