आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्माद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मानसिक रोगाचे अनेक प्रकार आहेत. त्यातील काही आजार अतिशय गंभीर, तर काही सौम्य प्रकारचे असतात. उन्माद हा मानसिक आजार आहे. कारण नसताना अति बडबड, जास्त शारीरिक हालचाली, अस्वस्थपण, चिडखोरपणा, आनंदाचे अवाजवी प्रदर्शन ही सगळी उन्मादाची लक्षणे आहेत. याचबरोबर रुग्ण कधी कधी असंबद्ध बडबडही करत राहतो. असे मनोरुग्ण आत्महत्या करू शकतात किंवा दुस-या ची हत्याही करू शकतात. अश रुग्णात संयमाचा अभाव असतो. काही मनोरुग्ण अतिखर्चिकपणा करून घरादारावर कर्जाचा डोंगर उभा करतात. उन्मादाचे झटके दोन-तीन महिने टिकतात. काही काळ व्यक्ती सामान्य बनते व परत उन्मादाचा झटका येतो.

मनोविकारतज्ज्ञांचा सल्ला घेणे अशा रुग्णांबाबत अतिशय महत्त्वाचे आहे. औषधे नियमितपणे घेतल्यास त्रास निश्चितपणे कमी होतो. जागतिक आरोग्य संघटनेने 2001 मध्ये mental health stop exclusion - date to care असे घोषवाक्य जाहीर केले होते. मनोरुग्णांना वाळीत न टाकता, त्यांची अवहेलना न करता काळजी घेण्याचा संदेश समाजाच्या पचनी पडला तर मनोरुग्णांच्या समस्या सुटायला नक्कीच हातभार लागेल.