Home | Magazine | Kimaya | nokia 3g service

नोकियासोबत मिळवा थ्रीजी सेवा

दिव्य मराठी | Update - Apr 20, 2012, 10:13 PM IST

नोकियाच्या या मोबाइलसोबत व्होडाफोन ग्राहकांना 3जी डाटा सुविधा मोफत उपलब्ध करून देत आहे.

  • nokia 3g service

    नोकियाच्या या मोबाइलसोबत व्होडाफोन ग्राहकांना 3जी डाटा सुविधा मोफत उपलब्ध करून देत आहे. या मोबाइलला इंटरनेटचे पॉवर हाऊस म्हटले जाते. नोकिया 303 आशा असे या मॉडेलचे नाव आहे. हा मोबाइल पूर्णत: क्वेर्टी टाइप कीपॅड आधारित टच अँड टाइप मोबाइल आहे. नोकिया एस-40 प्रमाणेच या मोबाइलचे कार्य चालणार आहे. याला 1 गीगाहर्ट्झचा शक्तिशाली प्रोसेसर लावण्यात आला आहे.
    याच्या 2.6 इंच स्क्रीनवर टाइप करण्याबरोबरच क्वेर्टी कीपॅडच्या मदतीने गतीने टाइप करता येते. याची अंतर्गत मेमरी 170 एमबी इतकी असून याला 32 जीबीपर्यंत वाढवता येते. 3.2 चा मेगापिक्सल कॅमेरा, एफएम, ब्ल्यूटूथ, म्युझिक आणि इंटरनेट रेडिओ या सुविधाही यात उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
    यात अनेक अ‍ॅप्लिके शन्स देण्यात आले आहेत. उदा. अँग्रीबर्ड्स गेम, मोबाइल टीव्हीचीही सुविधा आहे. नोकिया आशा 303 मॉडेल खरेदी करण्या-यांना चार महिने 4 जीबी आणि 3 जीबीचा डाटा मोफत मिळणार आहे. याची किंमत 8899 रुपये इतकी आहे.

Trending