आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुस्तकांची नोंद: भय आणि कातरतेच्या कथा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्रिवेदींच्या कथांमधली सगळी पात्रं, किंबहुना त्यांतला मध्यमवर्ग हा जागतिकीकरणाच्या उंबरठ्यावरचा आहे. ऐंशी आणि नव्वदच्या दशकातल्या मध्यमवर्गाचं हे चित्रण आहे. माणसाचं वस्तुकरण व्हायला सुरुवात झाल्याचा हा काळ! या संग्रहातल्या कथा इतक्या चिरेबंदपणे विशिष्ट काळातला समाज दाखवतात की, तो दस्तऐवज म्हणून बाटलीतरघुनंदन त्रिवेदी यांच्या कथा
> अनुवाद : जयप्रकाश सावंत
>प्रकाशक : लोकवाङ‌्मय गृह
>मूल्य : रु २००/- भरून म्युझियममध्ये ठेवावा आणि नंतरच्या लोकांनी त्याचा अभ्यास करावा. या कथांचे विषय झालेल्या माणसांना ओरखडे पडणार नाहीत, इतक्या मायेने ते त्यांच्याविषयी बोलतात. त्रिवेदींच्या या भावुकतेची, हळव्या मनाची आणि आंतरिक
कळवळ्याची तुलना मराठीतल्या साने गुरुजींशीच होऊ शकते.
शब्दांच्या अंतरंगात
संभाषणाच्या वा लेखनाच्या ओघात आपण असंख्य शब्दांचा वापर करतो. या शब्दांचे ‘कूळ आणि मूळ’ शोधणे हा एक मनोरंजक आणि भाषाभ्यासकांस तितकाच प्रेरणा देणारा विषय आहे. एखादा शब्द काही विशिष्ट अर्थाने आज वापरला जात असला तरी मुळात त्याच्या उगमस्थानी तो काही वेगळ्याच अर्थाने प्रसिद्ध असतो. कित्येकदा ‘शास्त्राद‌् रूढिर्बलीयसी’ या न्यायाने तो स्वीकारावा लागतो. मराठी भाषेमध्ये आज वापरात असणाऱ्या अनेक शब्दांचा निरीक्षणपूर्वक अभ्यास भाषातज्ज्ञ कै. सत्त्वशीला सामंत यांनी एकूण ४३ लेखांमधून सादर केला आहे.
शब्दरंग
लेिखका : सत्त्वशीला सामंत
प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन्स
मूल्य : रु. १८०/-
अर्थपूर्ण बदलासाठी...
व्यक्तिमत्त्व विकास व व्यावसायिक क्षेत्रातील विख्यात प्रशिक्षक आणि ‘बॉर्न टू विन’चे संस्थापक व संचालक अतुल राजोळी यांनी अत्यंत सहजसोप्या, हलक्याफुलक्या व मैत्रीपूर्ण शैलीत यशप्राप्तीचे ५० कानमंत्र या पुस्तकात दिले आहेत. त्यामुळे हे कानमंत्र आपल्या आयुष्यात प्रभावी बदल घडवण्यासाठी, आपली वैयक्तिक आणि व्यावसायिक स्वप्नं साध्य करण्यासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरतील. यशप्राप्तीच्या मार्गात प्रत्येक क्षणी साथ व प्रेरणा देणारा आणि तुमच्या सुप्त महत्त्वाकांक्षांना प्रत्यक्षात आणण्यासाठी उद्युक्त करणारा हा मित्र आहे.
माझा
मोटिव्हेटर
मित्र
लेखक : अतुल राजोळी
प्रकाशक : रोहन प्रकाशन
मूल्य : रु. १५०/-