Home | Magazine | Kimaya | now possible to control your car as per your mood

मिळवा कारवर नियंत्रण

दिव्य मराठी | Update - Jul 27, 2012, 10:56 PM IST

आता तुमच्या कारमधील वातावरण तुमच्या इशा-यावर बदलू शकाल. इंजिनिअर्सनी कारवर नियंत्रण मिळवण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे

  • now possible to control your car as per your mood

    आता तुमच्या कारमधील वातावरण तुमच्या इशा-यावर बदलू शकाल. इंजिनिअर्सनी कारवर नियंत्रण मिळवण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानात कारच्या डॅश बोर्डवर लावलेल्या ‘इन्फ्रारेड सेन्सर’ ड्रायव्हरच्या चेह-यावरचे हावभाव ओळखून कारवर नियंत्रण ठेवतो.
    जगभरात आपल्या इन्फोटेन्मेट सिस्टिमसाठी प्रसिद्ध असलेल्या हरमन टेक्नॉलाजीने ही यंत्रणा विकसित केलेली आहे.कारमध्ये बसवलेला कॉम्प्युटर चेह-यावरचे हावभाव समजून घेण्याचे काम करतो. यंत्रणेत चेह-यावर येणा-या वेगवेगळ्या हावभावाचे प्रोग्राम बनवण्यात आले आहेत. कारमधील दुसरी यंत्रणा तापमान नियंत्रित ठेवते.
    कारचा ड्रायव्हर मान हलवून वाजणा-या गाण्याचा आवाज कमी-जास्त करतो. जर कोणाचे नाव घेऊन फोनचा इशारा करताच त्याचा नंबरसुद्धा या यंत्रणेद्वारे जोडला जातो. हरमन इन्फोटेन्मेटने अशा यंत्रणेवर चालणारी एक प्रोटोटाइप कार बनवली आहे. कंपनीच्या मते, अशी कार येण्यास आणखी दोन ते तीन वर्षे लागू शकतात.

Trending