आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NPTI Course For Engineering Students, Divya Education

स्पर्धा परीक्षा: इंजिनिअर्ससाठी ‘एनपीटीआय’चा अभ्यासक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, बंगळुरू येथे ऊर्जा व विद्युत क्षेत्रातील ‘ट्रान्समिशन अँड डिस्ट्रिब्यूशन’ विषयक विशेष पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

अभ्यासक्रमासाठी उपलब्ध जागांचा तपशील : या अभ्यासक्रमासाठी एकूण उपलब्ध जागांची संख्या ६० असून, त्यापैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या अर्जदारांनी इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स अथवा पॉवर इंजिनिअरिंग यासारख्या विषयातील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.

निवड पद्धती : अर्जदारांच्या वर नमूद केलेल्या प्रवेशपात्रता परीक्षेच्या गुणांचा टक्केवारीनुसार त्यांना या अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.

अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास ५०० रु.चा ‘पीएसटीआय, बंगळुरू’च्या नावे असणारा व बंगळुरू येते देय असणारा डिमांडड्राफ्ट नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, बंगळुरूच्या कार्यालयात पाठवावा.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, बंगळुरूच्या दूरध्वनी क्र. ०८०-२६७११३७५८ वर संपर्क साधावा अथवा इन्स्टिट्यूटच्या www.kar.nic.in/psti या संकेतस्थळाला भेट द्यावी.
पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील भरलेले प्रवेश अर्ज दि. प्रिन्सिपॉल/ डायरेक्टर, पॉवर सििस्टम्स, ट्रेनिग इन्स्टिट्यूट, सुब्रमण्यपुरा रोड, बनशंकरी-२, स्टेज, बंगळुरू ५६०७० (कर्नाटक)या पत्त्यावर १३ ऑक्टोबर २०१४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.