आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Family... नवरा-बयकोमधील नित्याचिच तुतु-मैमै...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘तू काहीही म्हण; पण हे काही बरं नाही. दोघं भांड भांड भांडतात, ती पण काही कमी नाही. त्याने रागाच्या भरात एखादी चापट मारली, तर देवयानी पण सोडत नाही. ती पण चक्क मारते. परवा भांडण सोडवायला म्हणून गेले, तेव्हा अगं, मी जे चित्र पाहिलं ते फारच विचित्र होतं. अगं, चक्क तिने कॉलर पकडली होती शेखरची. मी अगदी सुन्न झाले. तू म्हणतेस स्त्री-पुरुष समानता, पण ही कसली आली समानता? आपण काय आपली संस्कृती काय. काही कळतच नाही या शिकल्या सवरल्या पोरींना. किती तरी दिवस माझ्या नजरेसमोरून ते चित्र जात नव्हतं.’ कमल सांगत होती.


देवयानी एक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट चालवणारी इंजिनिअर. लग्न करून करिअर सोडून सासरी आली. सासूला पारंपरिक रीतीभाती, सणवार जपणारी सून हवी होती. आपल्याला जे शक्य झालं नाही ते सुनेकडून पूर्ण करण्याचा सासूचा हट्ट. त्यात आजी व्हायची घाई. देवयानी अजून सून म्हणूनदेखील घरात रुळली नव्हती, त्यात गौरीचा जन्म झाला आणि आई म्हणून एक वेगळी जबाबदारी देवयानीवर आली. शेखरच्या भूमिकेत फारसा फरक झालेला नव्हता आणि घराबाहेर जास्त वेळ जात असल्याने देवयानी, आई, मुलगी याविषयी काही विचार करणंही त्याला गरजेचं वाटत नव्हतं. आपल्यापर्यंत काही आलं की, देवयानीला रागवायचं, वाट्टेल ते बोलायचं. मग आई शांत व्हायची. पण कशाचाच उपयोग होत नाही म्हटल्यावर आणि आपली भूमिका. जबाबदारी व्यवस्थित पार पाडणं जमत नाही, असं वाटलं की मारण्याचा पर्याय शेखर निवडायचा. एकुलता एक, सधन कुटुंबात वाढलेला इंजिनिअर झालेला शेखर. या कटकटी मला नकोच, असं त्याचं ठाम मत.