आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंदर्पकथा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोष्ट फार जुनी नाही, अगदी कालचीच! महागाईमुळे प्रत्येक गोष्टीचे भाव आभाळाला भिडू पाहत होते आणि आम जनता त्रस्त झाली होती; पण कोणत्याही गोष्टीमुळे मनावर नैराश्य येऊ द्यायचं नाही, त्यातूनही शोधलं तर काही तरी चांगलंच निष्पन्न होतं, ही आपली बाळबोध शिकवण! त्या दृष्टीने मी पाहू लागले आणि त्यात मला दिसली आपल्या मायबाप सरकारची जनतेच्या प्रकृतीबद्दलची कळकळ. खरं नाही वाटत? मग पाहा बरं!


साखर महागली? साखरेचा वापर कमी म्हणजे डायबिटीसचा धोका नाही. गहू, भाज्या, डाळी महागले? वापर आपोआपच कमी झाल्याने जिममध्ये पैसे न घालवताच झीरो फिगर. दूध महागलं? बरंच झालं. एरवीही खरं तर दूध लहान बाळांकरिताच असतं. मोठ्या माणसांना त्याची मुळीच आवश्यकता नसते. उलट त्यामुळे किडनी स्टोन व्हायचीच भीती. मटण/चिकन महागलं? उत्तम! आतड्याचा कॅन्सर व्हायची शक्यता सामिष भोजनातच जास्त असते आणि एरवीही आपला धर्म ‘अहिंसा परमोधर्म’ हेच शिकवतो ना? थोडक्यात या गोष्टींमुळे कुठलंच नुकसान झालेलं नाही; पण जेव्हा गरिबाच्या भाकरीबरोबर खाल्ल्या जाणा-या कांद्यावर सरकारची वक्रदृष्टी पडली तेव्हा कहर झाला. कांद्याचा भाव वर जाता जाता 90 रु. किलो झाला म्हणजे कांदा असला तरी डोळ्यांना धार, नसला तर महापूरच! ही तीच कंदर्पकथा!


एक जाहिरात आठवते? टेबलाच्या पलीकडे बसलेला अधिकारी गि-हाइकाचं काम करण्याकरिता प्रीमियम मागतो, तर गि-हाईक निरागसपणे प्रीमियम चहाचा पुडा त्याच्या पुढे सरकवते आणि त्याचं तोंड पाहण्यालायक होतं. आमच्या इथे असाच प्रसंग घडला; पण आमच्या इथल्या गि-हाइकाने दिलेल्या प्रीमियमने तर अधिका-याची, आमच्या भाषेत सांगायचं तर अक्षरश: ‘बाँछे खिल गई.’ कारण? प्रीमियम होता टेबलाखालून दिले गेलेले 9 किलो कांदे!


इन्कम टॅक्सवाल्यांची तीक्ष्ण नजर कुणी किती कांदे खरिदले यावर होती आणि अशा घरांवर धडाधड धाडी पडत होत्या. सगळं वातावरणच निराशाजनक झालं होतं. विरंगुळा म्हणून मी टीव्ही लावला तर मुख्य कार्यक्रम कमी, जाहिरातीच जास्त. पेपर उघडला तर त्यात रवींद्र भवनमध्ये होणा-या मुशाय-याची म्हणजे कविसंमेलनाची जाहिरात होती. तेव्हा ‘गम गलत’ करायला मी तिथे जायचं ठरवलं.


सुरुवातीचे एक-दोन कवी बरे होते; पण त्यानंतर पाहिलं तर प्रत्येक कवीच्या काव्याचा केंद्रबिंदू आपला कांदाच. ज्याला आम्ही लोक प्याज म्हणतो तोच! एखादे दिवशी चुकून साधं निरामिष ‘सालन’ जरी करायचं ठरवलं तरी त्यात प्याज हवाच. साहजिकच सर्व काव्य प्याजने ओतप्रोत भरलेलं. वानगीदाखल सिनेमातल्या गाण्याच्या चालीवर काही काव्यांचे हे मुखडेच पाहा. ‘प्याज बिना चैन कहाँ रेऽऽ प्याज बिना चैन कहाँ रे’, ‘प्याज लिया तो डरना क्या... इन्कमटॅक्सवाल्यांना उद्देशून.... प्याज लिया कोई चोरी नही की चुपचुप रह कर छिपना क्या...’ कांद्याला उद्देशत ‘मेरा प्यार भी तू है ये बहार भी तू है’, ‘पलभर के लिये कोई हमे प्याज दे दे थोडा ही सही’ किंवा ‘हमें तुमसे प्यार कितना ये हम नही जानते मगर जी नही सकते तुम्हारे बिना’ आणि ‘ये मेरा दिल दिवाना, प्याज का दिवाना, दिवाना दिवाना ये प्याज का दिवाना.’ सर्व रवींद्रभवन कांद्याच्या वासाने भरून गेल्यासारखं वाटू लागलं आणि या वासात लडबडलेल्या मुशाय-याने डोकं दुखायला लागलं व मी घरी परतले.


घरात दुसरंच नाटक समोर ठाकलेलं आढळलं. माझी नुकतीच लग्न झालेली मुलगी सासरहून परतलेली. तिला ढसाढसा रडताना पाहून माझ्या तर काळजाचा ठोकाच चुकला. भरपूर दहेज देऊनसुद्धा तिचा सासुरवास कुठूनही कमी होत नव्हता. रोज उठून एक नवीन मागणी आणि ती पुरी केली नाही तर दुसरी तयार! कशाने हिची हायकमांड - सासू - खुश राहील समजत नव्हतं. पण कशी कुणास ठाऊक माझी ‘दिमाग की बत्ती’ एकदम पेटली. तिची पाठवणी करताना चांगले 15 किलो कांदे बरोबर दिले आणि सासूबाई एकदम खुश झाल्याचं समजून माझा जीव भांड्यांत पडला.


दुस-या दिवशी सकाळी बेल वाजली. दार उघडलं तर समोर तीन अनोळखी व्यक्ती उभ्या होत्या. स्वत:ची ओळख इन्कमटॅक्स ऑफिसर अशी करत त्यांनी घराची झडती घ्यायचा हुकूम असलेला कागद माझ्या हातात दिला. माझ्या घरात कुठलं सोनं- नाणं किंवा लपवून ठेवलेल्या नोटा? पण नाही. त्यांनी घरात उचकपाचक करायला सुरुवात केली आणि दुर्दैवाने कुठे कुठे लपवून ठेवलेले कांदेच त्यांनी नेमके हेरले. नशीब, लॉकर उघडायला लावला नाही. तसंही त्या दिवशी बँक बंद होती म्हणा! इतके हातपाय जोडले, पण कसचं काय आणि कसचं काय! शेवटी गरमागरम चहा, कांद्याची भजी आणि वर 15 किलो कांद्याची दक्षिणा घेतल्यानंतर ही ब्याद टळली. मला खात्री होती मुलीच्या सासूनेच दुष्टतेच्या पोटी त्यांना चिथावलं असणार. दुस-या दिवशी समजलं की, माझा अंदाज शंभर टक्के खरा होता. इन्कमटॅक्स ऑफिसर म्हणवून घेणा-यांचा व इन्कमटॅक्स डिपार्टमेंटचा सुतराम संबंध नव्हता. उलट ते तिन्ही चोर सासूच्या नात्यातलेच लोक होते. मनात म्हटलं, जाऊ द्या. ‘रात गई बात गई.’ कमीत कमी माझी पोरगी सुखात नांदो.
यातून जरा स्थिरावले तर टीव्हीवर बातम्या पाहत होते. रक्षाबंधनाच्या दिवशी आमच्या एका मंत्रिमहोदयांना ज्या ज्या भगिनींनी राख्या बांधल्या, त्यांना चक्क कांदे भेट म्हणून मिळाले.
याव्यतिरिक्त आणखीनही ज्या घडामोडी झाल्या. त्यापण ऐकण्यालायक आहेत. तुम्हाला माहीत नसल्यास सांगते की, कांद्यामुळे काय काय झालं ते पाहा.
‘कंदर्प आले नगरात सर्व भाज्या भयभीत
भजी सांडगे कढईत उड्या मारती टणाटणा
भेंड्याची वाकडी हो नांगी पुटकुळ्या उठल्या कारल्या अंगी
काळीकुट्ट झाली वांगी कंदर्पभये करोनी
मोठमोठ्यांची ऐशी स्थिती लहानाचा पाड किती
जीव घेवोनी पळती कंदर्पभये करोनी
हे खरं आहे ना? कांद्याची आणखीन महत्त्वाची माहिती म्हणजे जरी अल्ल An apple a day keeps the doctor away (and if the doctor is smart throw the apple away) °fSXe An onion a day, will keep everybody away!