आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘प्रसार भारती’ची कार्यक्रम अधिकारी निवड परीक्षा-2013

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘प्रसार भारती’तर्फे कार्यक्रम अधिकारी व प्रसारण अधिका-यांची निवड करण्यासाठी घेण्यात येणा-या अधिकारी निवड परीक्षा-2013 साठी अर्ज मागवण्यात येत आहेत.
* जागांची संख्या व तपशील : या निवड परीक्षेद्वारा महाराष्ट्रासाठी निवड करण्याच्या उमेदवारांची संख्या 80 असून यापैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव आहेत.
* आवश्यक पात्रता : १ पदव्युत्तर पात्रताधारक व साहित्यिक संगीत-वादन क्षेत्रातील विशेष प्रावीण्य.
* पदवीधर व नाट्यकलाविषयक पदविकाधारक.
* संगीत विषयातील विशेष पदविका.
* आकाशवाणी तत्सम माध्यमाद्वारे संगीत गायन-प्रसारणविषयक अनुभव. १पत्रकारितेतील पदव्युत्तर पात्रता.
* वयोमर्यादा : 30 वर्षे. राखीव गट उमेदवारासाठी शिथिलक्षम.
* निवड पद्धती : पात्रताधारकांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलावणार ही निवड परीक्षा राष्ट्रीय स्तरावर निर्धारित परीक्षा केंद्रांवर होईल. त्यात औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, पुणे, नाशिक व अमरावती या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल.
लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळवणा-या उमेदवारांना कौशल्य चाचणी व मुलाखतीसाठी बोलावण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
* वेतनश्रेणी व फायदे : निवडलेल्या उमेदवारांना प्रसार भारतीमध्ये अधिकारी म्हणून दरमहा 9300-34800+4600 या वेतनश्रेणीत इतर भत्ते व फायद्यांसह नेमण्यात येईल.
* अर्जासह पाठवायचे शुल्क : 200 रु. रोखीने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कुठल्याही शाखेत रोखीने भरणे आवश्यक आहे.
* अधिक माहिती व तपशील : अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 23 ते 29 मार्च 2013 च्या अंकात प्रकाशित झालेली प्रसार भारतीची जाहिरात पाहावी अथवा कर्मचारी निवड आयोगाच्या http://ssconline2.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
* अर्जाची पद्धत व तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्जाची शेवटची तारीख 19 एप्रिल 2013.
सुरुवातीला नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक असणा-या ज्या उमेदवारांना प्रसार भारतीमध्ये अधिकारी पदावर आपली कारकीर्द सुरू करायची असेल अशांसाठी ही स्पर्धा परीक्षा उपयुक्त ठरू शकते.