आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Oragan Donation, Regarding Research Plantation And Vigilance

अवयवदान, प्रत्यारोपणासंबंधी संशोधन आणि जागरूकता हवी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अवयव प्रत्यारोपणाचे तीन मूलभूत प्रकार आहेत. जिवंत संबंधित यामध्ये जवळच्या स्त्री किंवा पुरुष नातेवाइकांकडून व्यक्तीला अवयव दिला जातो. जिवंत असंबंधित यामध्ये अनुरूप असलेल्या कोणत्याही दात्याकडून व्यक्तीला अवयव दिला जातो. मृत यामध्ये एक मृत अधिक स्पष्टपणे मस्तिष्क मृत (मेंदू - मृत) व्यक्तीकडून व्यक्तीला अवयव दिला जातो. भारतात प्रत्येकवर्षी तीन ते साडेतीन लाख लोक मूत्रपिंड निकामी होण्याने मृत्युमुखी पडतात. शरीरातील अनावश्यक गोष्टीची विल्हेवाट लावणे, मूत्रनिर्मिती करणे, हाडे बळकट करणे, रक्तपेशी तयार करणे, यासारखी अतिमहत्त्वाची कार्य मूत्रपिंडाची असतात. जेव्हा हे करण्यासाठी मूत्रपिंड पुरेसे सक्षम राहत नाही, तेव्हा आजार शेवटच्या पायरीपर्यंत येऊन पोहोचला असे म्हटले जाते. उपचाराविना रुग्ण वाचू शकत नाही.

* मूत्रपिंडरोपणानंतर पूर्ववत आयुष्य :
किडनी निकामी झाल्यावर आयुष्यभर डायलिसिसवर राहणे किंवा मूत्रपिंड बदलून दुस-या मूत्रपिंडाचे रोपण करणे, असे दोन मार्गच असतात. डायालिसिस हा उपचार अंशत:च परिणामकारक असतो. शिवाय बराच खर्चिकही आहे. या उपचारासाठी दर महिन्याला अंदाजे जास्तीत जास्त 20 ते 25 हजार खर्च येऊ शकतो. या उपचारानंतर रुग्ण पुन्हा पूर्वीसारखेच चांगले आयुष्य जगू शकेल अशीही खात्री नसते. मूत्रपिंडरोपण शस्त्रक्रियेनंतर व्यक्ती पूर्ववत आयुष्य जगू शकते, म्हणूनच या आजाराच्या शेवटच्या पायरीला असलेल्या व्यक्तींसाठी मूत्रपिंडरोपण हाच पर्याय वैद्यकीय क्षेत्रात भरवशाचा पहिल्या वर्षी औषधोपचारासाठी जवळपास इतकाच खर्च येतो. मूत्रपिंडरोपण यशस्वी झाल्यानंतर हा खर्च महिन्याला दोन ते तीन हजार इतका खालीही येतो.

* ब्रेन डेड घोषित व्यक्तींची कार्यक्षम इंद्रिये उपयोगात येऊ शकतात : जिवंत व्यक्ती आपल्या अवयवाचे दान करू शकते. एका मूत्रपिंडाचे दान करूनही दुस-या निरोगी मूत्रपिंडाच्या आधारे सर्वसामान्य आयुष्य जगता येते. काही वेळा यकृताचा किंवा स्वादुपिंड ग्रंथीचा एक भाग दान करून एखाद्या जवळच्या मित्राला किंवा कुटुंबीयाला दीर्घायुष्य मिळवून देता येते. रक्त, अस्थी आणि अस्थिमज्जा यांचेही दान करता येते. यासाठी दानपत्राची आवश्यकता नसते. मृतवत व्यक्तीचे मूत्रपिंड वापरले जाण्याचे प्रमाण भारतात अजूनही अत्यल्पच आहे. मृतवत व्यक्ती (मस्तिष्क-मृत) म्हणजेच ब्रेन डेड म्हणून घोषित केलेली व्यक्ती, अशा व्यक्तीची कार्यक्षम इंद्रिये काढून घेऊन ती ज्या रुग्णांचा आजार शेवटच्या टप्प्यात आलेला आहे, त्याच्यात बसवली जाते.
* अवयव प्रत्यारोपणासाठी अद्ययावत यंत्रणा, तज्ज्ञांचा अभाव :
मस्तिष्क-मृत ही अशी अंतिम अवस्था आहे की, ज्यामध्ये गाढ बेशुद्धावस्थेत असलेला रुग्ण पुन्हा कधीही सचेतन होत नाही. त्याची हृदय क्रिया, रक्ताभिसरण कृत्रिम पद्धतीने चालू ठेवलेली असते. बाकी सर्व प्रकारे वैद्यकीयदृष्ट्या तो मृतच असतो. ज्याक्षणी रुग्णालयातील कृत्रिम श्वासोच्छवास पुरवणारे यंत्र बंद केले जाते, त्याक्षणी तो पूर्णपणे अचेतन होतो. हा प्रसंग रुग्णालयातील अतिदक्षता विभागात संचालित वातावरणात घडत असल्यामुळे अशा मृताचे बहुतेक सर्व अवयव यशस्वीपणे काढून घेऊन त्याचा प्रत्यारोपणासाठी उपयोग करता येतो. एखादी व्यक्ती मस्तिष्क मृत झाल्याचे सरकारने शिफारस केलेल्या समितीचे सदस्य असलेल्या या उपचारात सहभागी न झालेल्या, दुस-या एखाद्या रुग्णालयातील डॉक्टरांचा एक गट मस्तिक-मृत झाल्याचा निर्णय देतो. हे डॉक्टर काही विशिष्ट चाचण्यांची मालिका वापरून त्यानंतरच सदर रुग्ण खात्रीशीरपणे मस्तिक मृत झाल्याचा निर्णय देतात. अवयव प्रत्यारोपणाच्या कामी सर्वात मोठा अडथळा म्हणजे दान केल्या जाणा-या अवयवांची कमतरता आणि त्याच्या वेळच्या वेळी पुरवठा न होणे. तसेच अवयव प्रत्यारोपणासाठी आवश्यक असलेल्या अद्ययावत यंत्रणेचा व तज्ज्ञांचा अभाव.
* अवयव विक्रीस विरोध बंदी, अवयवदान कधीही रद्द करता येते :
अवयव दान कोणीही करू शकतात. यासाठी फक्त तशी इच्छा असणे गरजेचे आहे. 18 वर्षे वयाच्या आतील किशोर हे दान करू शकतात; परंतु पालकांच्या किंवा कायदेशीररीत्या जबाबदार व्यक्तीच्या संमतीनेच अवयवदाता होण्यासाठी फक्त दानपत्रावर स्वाक्षरी करून ते सतत पाकिटात घालून बरोबर बाळगावे लागेल, जेणेकरून तुमच्या मृत्यूनंतर कोणीतरी रुग्णालयाला त्याविषयी कल्पना देईल. अवयव दान करण्याची कोणतीही सक्ती नाही. तुमचा विचार बदलला तर फक्त स्वाक्षरी केलेले पत्र फाडून टाकावे. अवयव दानाचा मार्ग तुम्ही कोणत्याही कारणास्तव स्वीकारला आहे, याविषयी कुटुंबीयांशी चर्चा करणे गरजेचे असते. त्यांना पटवून देण्यासाठी मित्र, आप्त, धार्मिक अधिकारी तसेच समाजसेवकांची मदत घ्यावी. कोणताही धर्म अवयव दानाच्या आड येत नाही. कारण, यात इतरांना मदत केली जाते. अगदी थोड्या धर्मांमध्ये मात्र हा निर्णय ज्या त्या व्यक्तीवरच सोपवला जातो.अवयव विकण्याची परवानगी नाही. मानवीय अवयव प्रत्यारोपणाच्या 1994 च्या कायद्यानुसार अवयवांचा व्यापार करण्याची सक्त मनाई आहे. भारतात याबाबत उदासीनता आहे. मस्तिष्क -मृत (ब्रेन डेड) चे निदान झाल्यावर अवयवदाता होऊ शकणारी व्यक्ती निश्चित केली जाते.