आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांसाठी भिंतीबाहेरील शिक्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मित्रांनो, मे महिन्याच्या सुटीत आपण मुंबईला येणार असाल तर तुमच्यातल्या कलागुण कौशल्याला वाव देणारे काही छोटे अभ्यासक्रम आम्ही मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण विभागाने तयार केले आहेत. या अभ्यासक्रमाद्वारे तुम्हाला निसर्गाची गोडी लागेल त्याचबरोबर सुटीत वेगळी अशी धमाल करू शकाल.
शिवाय नवे मित्रही जोडू शकाल. तुमच्यासाठी नेमके काय अभ्यासक्रम आहेत त्याची माहिती आणि वेळापत्रक आम्ही देत आहोत.


जादू आणि विज्ञान
6 दिवस- 1 मे ते 6 मे, सकाळची सत्रे 11 ते 1, शुल्क- रु. 1200 ( अधिक किटची किंमत रु 1000.)
सुप्रसिद्ध जादूगार कृती पारीख स्वत: प्रयोग करून दाखवतील आणि मग शिकवतील. अखेरच्या दिवशी प्रत्येकाने स्वत: जादू सादर करायची आहे, त्यावेळी पालकांस आमंत्रण.


रोबोटिक्स
15 दिवस - 5 मे ते 19 मे - स. 11 ते दु. 4. - शुल्क रु. 2000 (मशीनच्या डिझाइननुसार सुट्या भागांचा खर्च साधारण रु. 2 हजारच्या घरात. तो मुलांनीच प्रत्यक्ष खरेदी करताना करायचा आहे. मशीनच्या भागांची खरेदी करण्यासाठी मुलांना विभागाच्या वाहनाने लॅमिंग्टन रोडला घेऊन जाण्यात येईल.) अखेरच्या दिवशी मुलांच्या मशीन्सची अंतिम स्पर्धा घेण्यात येईल आणि विजेत्यांना पारितोषिके असतील.


खनिजद्रव्ये आणि खडकांची ओळख
3 दिवस-1 मे ते 3 मे, दु. 2.30 ते सं. 5.30. शुल्क रु. 750 (खडक आणि खनिजद्रव्यांचा संग्रह रु. 2500 ऐच्छिक)
शोभिवंत मत्स्यालय- निर्मिती आणि निगा
3 दिवस - 4 मे ते 6 मे, स. 11 ते दु. 2, शुल्क रु. 750
खगोलशास्त्राची अनोखी दुनिया
6 दिवस, 4 मे ते 9 मे, दु. 2.30 ते सं. 5.30, शुल्क रु. 1000
रसायनांची अनोखी दुनिया
3 दिवस-8 मे ते 10 मे, स. 11 ते दु. 2. शुल्क रु. 750 ( रसायन संच रु. 600)
पदार्थांची अनोखी दुनिया
3 दिवस, 11 मे ते 13 मे, स. 11 ते दु. 2. , शुल्क रु. 750
सर्प आणि उभयचरांची अनोखी दुनिया
2 दिवस, 11, 12 मे. स. 11 ते दु. 2., शुल्क रु. 500
पक्ष्यांची अनोखी दुनिया
3 दिवस - 11 ते 13 मे., दु. 2.30 ते सं. 5.30. शुल्क रु. 750
फुलपाखरे आणि पतंग
2 दिवस, 15, 16 मे, दु. 2.30 ते सं. 5.30., शुल्क रु. 500
मुलांसाठी पुरातत्त्वशास्त्र
3 दिवस - 14 मे ते 16 मे. स. 11 ते दु. 2., शुल्क रु. 750
या कार्यक्रमांतर्गत कदाचित एखादी अभ्याससहल एलेफन्टा किंवा घारापुरी येथे घेण्यात येईल. मुलांची तयारी आणि हवामान याचा अंदाज घेऊनच हे ठरवण्यात येईल. त्याचा खर्च प्रत्येकी रु. 900 असेल.
भूमितीचा खेळ
2 दिवस, 17, 18 मे. , स. 11 ते दु. 2. , शुल्क रु. 500
संख्यांचा खेळ
2 दिवस- 21, 22 मे., स. 11 ते दु. 2. शुल्क रु. 500
ओरिगामी- कागदातून कला
5 दिवस - 18 मे ते 23 मे, दु. 2.30 ते सं. 5.30, शुल्क रु. 1000 ( अधिक कागदसंच रु. 100)
केलेल्या कलावस्तू प्रत्येकाने आपापल्या घरी न्यायच्या आहेत.
मातीच्या भांड्यांची गंमत
5 दिवस, 21 मे ते 25 मे., स. 11 ते दु. 3., शुल्क रु. 1600 .
कडक उन्हात भांडी सुकल्यानंतर भट्टी लावून भाजावी लागतात. सर्वांनी आपापली भाजलेली घरी भांडी घेऊन जायची.
व्यंगचित्रकला- कार्टून ड्रॉइंग
2 दिवस - 21, 22 मे., स. 11 ते दु. 2. शुल्क रु. 500,
मुलांसाठी वेब-डिझायनिंग
10 दिवस - 16 मे ते 28 मे., स. 11 ते दु. 2, शुल्क रु. 2000
आपल्या झाडांची ओळख
2 दिवस - 25 मे, 26 मे. स. 11 ते दु. 2. शुल्क रु. 500
प्रवेशासाठी बहि:शाल शिक्षण विभागाचा 2 रा मजला, आरोग्य केंद्र, विद्यानगरी, कालिना, सांताक्रूझ पूर्व येथील कार्यालयात यावे. अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकांवर संपर्क साधावा किंवा संकेतस्थळास भेट द्यावी. 022-26543011/26530266.www.extramural.org.
विशेष सूचना- फोन खूपच व्यस्त असल्याने लागत नाहीत. थेट प्रवेश
घेण्यासाठीच यावे.