आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फुप्फुसाच्या कर्करोगावर मात करा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


माझ्या उपचाराला सुरुवात झाली. माझी रवानगी इमर्जंसी वॉर्डामधून आयसीयूमध्ये करण्यात आली. मला डॉक्टर सचिन हिनगमिरे ऑक्रॉलॉजिस्ट व डॉक्टर पवार यांच्या निगरा खाली ठेवण्यात आले. छातीतले पाणी असल्याने पाणी काढल्यानंतर 10 दिवसाने बरे वाटू लागले.पंधरा दिवस रुग्णालयात राहून कॅन्सरचा इलाज केल्यावर दर महिन्याला एक या प्रमाणे किमोथेरेपी सहा महिने घेतली. डॉक्टरांच्या मते मी केमो चांगले सहन केले. हे 10 दिवस चिंतक्रांत गेले. मुलगा अजित व पत्नीने माझ्याबरोबर रुग्णालयात राहून मला खूप धीर दिला.

किमोथेरेपी झाल्यानंतर औषधी गोळ्या सुरू करण्याचे ठरवले. औषधी गोळ्यामुळे फारसा फरक 2 महिने दिसला नाही. याच दरम्यान माझ्या मेहुण्याचा एक मित्र यूएसएमध्ये एका रुग्णालयात ऑ नकोलॉडिपार्टमेंटमध्ये काम करतो. मेहुण्याच्या सांगण्यावरून त्यांच्या मित्राकडे सर्व रिपोर्टस व ब्लड सेक्शन तपासणीसाठी पाठविले. त्याने त्यांच्या डिपार्टमेंट प्रयोग शाळेत तपासण्या परीक्षणानंतर पुण्यात केलेले निदान बरोबर असून लाइन ऑफ ट्रीटमेंट योग्य असल्याचे सांगितले.

फाइजर कंपनीने लंग कॅन्सरवर काही नवीन औषधी गोळ्या काढल्या आहेत. त्याचा चांगला उपयोग यूएसए मधील पेशेंटमध्ये दिसून आल्याचेही सांगितले. या गोळ्या भारतात मिळत नाहीत. मात्र, प्रयत्न केल्यास ट्रायला पेशेंट म्हणून कंपनी तुम्हाला तुमच्या डॉक्टरांच्या शिफारशी वरून त्या गोळ्या पाठवू शकतील असे सांगण्यात आले. या गोळ्यासाठी यूएसएमधील डॉक्टर पेठकर व मुलगा अजित यांना केलेले प्रयत्न वाखाण्यासारखे आहेत. माझ्या डॉक्टरांची सहमती घेतली. तत्पूर्वी आम्हा कुटुंबाला डॉक्टरने ही उपचार पद्धती नवीन आहे. भारतात ही प्रचलीत नाही. याची कल्पना दिली. तसेच यूकेमधून गोळ्या घेण्यासाठी शिफारस केली. इम्पोर्ट लाइसन्सची आवश्यकता होती. मोठ्या मुलाने मुंबईला जाऊन इम्पोर्ट परमिट अप्लाय केले व ते विनासायास 45 मिनिटांत मिळाले. हा एक सुखद धक्का होता.

पंधरा दिवसांतच फायझर फर्मास्यूटिकलकडून पहिला 50 गोळ्याचा लॉट मिळाला. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध-गोळ्या सुरू केल्या. दर महिन्याला रेग्युलर चेकअप, सिटीस्कॅन सुरू होते. आजारावर उपचारानंतर हळूहळू नियंत्रण बसत चालले होते. डॉक्टरांनी औषध-गोळ्या चांगल्या लागू होत असल्याचे सांगितले. तीन महिन्यानंतर कॅन्सरचा 70 टक्के प्रादुर्भाव कमी झाल्याचा रिपोर्ट पाहून डॉक्टर व कुटुंबिय खुप आनंदी झाले. डॉक्टरांनी लवकर यश मिळण्याच्या मागे माझा औषधींना व उपचारांना चांगला प्रतिसाद आणि माझी सकारात्मक वृती ही उपयोगी पडल्याचा उल्लेख केला. ते काही अंशी खरे आहे.

मला वेळेवर योग्य ठिकाणी योग्य डॉक्टरकडून उपचार मिळाल्याने तसेच माझ्या सर्व कुटुंबियाने अडचणीच्या काळात दिलेल्या धीराने व माझ्या मित्रांच्या व नातलगाच्या शुभेच्छा असल्याने मला रोगाला प्रतिबंध घालण्यास वेळ लागला नाही. हेही तितकेच खरे. त्यामुळे या आजाराच्या पेशेंटनी घाबरून न जाता धीराने सामना करण्याची खरी गरज आहे, इतकेच मी म्हणेण.