Home »Magazine »Niramay» Ozone Layer Problem

ओझोन उपचार एक आश्चर्यकारक पद्धती

डॉ. रोहिणी पिसोळकर, औरंगाबाद | May 20, 2013, 22:50 PM IST

कॅन्सर व ओझोन उपचार यावर संशोधन चालू आहे. त्याचे उत्तम रिझल्ट मिळत आहेत. शास्त्रज्ञांना त्यांच्या संशोधनात असे आढळले की कॅन्सरच्या रुग्णांमध्ये शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत जाते. प्राथमिक व द्वितीय श्रेणीच्या कॅन्सर रुग्णांना पुढील कीमो, रेडिएशन उपचारासाठी ताकद निर्माण करण्यासाठी तर कॅन्सरच्या शेवटच्या अवस्थेतील रुग्णांना किमो व रेडिएशनचे दुष्परिणाम घालवण्यासाठी व रुग्णाला सामान्य आरोग्य जगण्यासाठी (स्टॅबलाइज करण्यासाठी) फायदा होतो. संधिवात, मायग्रेन, सोरायसिससारख्या महाभयंकर रोगांवरही ओझोनचा चांगला परिणाम दिसून आला आहे.

शुद्ध ऑक्सिजनचे (o2) रूपांतर मशीनद्वारे ओझोन (o3) मध्ये करून तो विविध रोगांमध्ये वापरला जातो, याला ओझोन उपचार पद्धती म्हणतात. ही एक नवी उपचार प्रणाली वाटत असली तरी मोठ्या शहरात यानुसार उपचार होत आहेत.
वातावरण शुद्ध करणार्‍या ओझोनच्या प्रभावी गुणधर्मामुळे शास्त्रज्ञांचे लक्ष ओझोनद्वारे मानवाचे आरोग्य सुधारू शकतो का? याकडे वेधले गेले आणि कालांतराने ओझोनच्या पर्यायी उपचार पद्धतीचा उदय झाला. ओझोनचा जंतूनाशक म्हणून वापर 1981 मध्ये केला गेला. पहिल्या महायुद्धातही जखमी सैनिकांवर उपचार करताना ओझोनचा वापर केला होता. जर्मनीतले डॉ. हॅन्स व्हॉल्फ यांनी वैद्यकीय उपचाराचा भाग म्हणून ओझोनचा वापर 1953 मध्ये सुरू केला. आज फ्रान्स, अमेरिका, रशिया, क्युबा, इटलीमध्ये तसेच भारतात मुंबई, पुणे, कोलकाता, दिल्ली येथे या पद्धतीचा वापर होतो.
औरंगाबादच्या एका हॉस्पिटलच्या सहकार्याने कॅन्सर व ओझोन उपचार यावर संशोधन चालू आहे. त्याचे उत्तम रिझल्ट मिळत आहेत. शास्त्रज्ञांना त्यांच्या संशोधनात असे आढळले की कॅन्सरच्या रुग्णांमध्ये शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत जाते. प्राथमिक व द्वितीय श्रेणीच्या कॅन्सर रुग्णांना पुढील किमो, रेडिएशन उपचारासाठी ताकद निर्माण करण्यासाठी तर कॅन्सरच्या शेवटच्या अवस्थेतील रुग्णांना किमो व रेडिएशनचे दुष्परिणाम घालवण्यासाठी व रुग्णाला सामान्य आरोग्य जगण्यासाठी (स्टॅबलाइज करण्यासाठी) फायदा होतो. संधिवात, मायग्रेन, सोरायसिससारख्या महाभयंकर रोगांवरही ओझोनचा चांगला परिणाम दिसून आला आहे.
ओझोन हा सूज व वेदना कमी करणारा, जखम लवकर भरून आणणारा, जंतूंचा नाश करणारा वायू आहे. त्यामुळे संधिवात, त्वचारोग तसेच बर्‍या न होणार्‍या डायबिटीसच्या जखमा यांवरही ओझोनचे अतिशय चांगले परिणाम दिसून येतात. आपण नाकावाटे प्राणवायू घेतो तो फुप्फुसांद्वारे रक्तामध्ये मिसळला जातो. हा रक्तातील प्राणवायू पेशींच्या ज्वलनासाठी वापरला जातो.
आपल्या शरीरात रक्तपेशीत ही ज्वलनक्रिया सुरू असते आणि त्यासाठी प्राणवायूची नितांत आवश्यकता असते. मात्र, बरेचदा आपण नाकाद्वारे जो प्राणवायू घेतो तो प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतोच असे नाही. उलट कार्बन मोनॉक्साइड, लॅक्टिक अ‍ॅसिड सारखी विषारी द्रव्य, तयार होतात व साठत जातात. रक्ताचा पीएच अल्कलाइन न राहता अ‍ॅसिडिक होतो. अशा दूषित पेशींमुळे विविध रोग उद्भवतात. कॅन्सरसारखा रोग हा शरीरातील अशाच विषारी द्रव्यांचा परिपाक असतो.
ओझोन हा ऑक्सिजनप्रमाणे नाकावाटे घेता येत नाही. तो निरनिराळ्या 11 मार्गाने शरीरात सोडला जातो. आजाराच्या तीव्रतेवर ओझोन थेरपीची 10 च्या प्रमाणात सिटींग घ्यावी लागतात शक्यतो वर्षातून 2 ते 3 सेटमध्ये शरीरावर कोणतेही दुष्परिणाम न होता आजारावर नियंत्रण ठेवता येते.
इंजेक्शन : संधिवातामध्ये दुखणार्‍या सांधाच्या ठिकाणी ओझोन दिल्याने वेदना, सूज कमी होते. सांध्याच्या हालचाली सुरळीत होतात. (उदा. गुडघेदुखी, कंबरदुखी, खांदेदुखी)
गुदमार्ग, योनिमार्ग : या दोन्ही मार्गातून रक्तपुरवठा जास्त असल्याने या मार्गातून दिलेला ओझोन लागलीच रक्तामध्ये शोषला जातो व संपूर्ण शरीरात पसरतो. व्याधींविरुद्ध प्रतिकार क्षमता वाढते. मधुमेह व त्यामुळे झालेल्या आजारात, संधिवात व पचनाच्या दीर्घकालीन समस्यांवर या मार्गाने ओझोन दिल्यास काही दिवसात चांगला फरक पडतो. कंपवात, चयापचय विकार, स्त्रियांच्या मासिक पाळी, पी. सी. ओ. डी. व आर्तव विकासामध्येही याचा खूप फायदा होतो.
मेजर ऑटो हिमोथेरपी : या प्रकारात रुग्णांचे 30 ते 50 मिली रक्त घेऊन त्यात ओझोन मिश्रित करून तेच रक्त लगेच शरीरात पाठवले जाते. रक्तशुद्धीकरण करण्यासाठी जर्मनीमध्ये प्रचलीत अशी ही पद्धत आहे. ओझोन मिश्रित म्हणजेच ऑक्सिजनचे प्रमाण वाढलेले हे रक्त रुग्णांची प्रतिकार शक्ती वाढवते. काविळ, मधुमेह, उत्साहवर्धन यासाठी याचा वापर होतो.
मायनर ऑटो हिमोथेरपी : या प्रकारात रुग्णांचे 5 मिली रक्त घेऊन त्यात ओझोन मिश्रित करून तेच रक्त लगेच शरीरात स्नायुमध्ये दिले जाते. त्वचाविकार, अ‍ॅलर्जीमध्ये या प्रणालीचा बराच वापर होतो.
ओझोनेटेड सलाइन : सलाइनमध्ये ओझोन वायू मिसळून दिल्यास चयापचय सुधारते व रुग्णाची प्रतिकारक्षमता वाढते. आंत्रवण, कॅन्सर, रक्तविकारात या प्रकारे उपचार करतात. दीर्घकालीन औषधोपचाराने आलेला थकवा निघून जातो व रुग्णाला ताजेतवाने वाटू लागते.

Next Article

Recommended