आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुष्याचं पासबुक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सस्नेह नमस्कार!
मी तीस वर्षांची एक घटस्फोटित स्त्री आहे. तेवीस वर्षांची असताना माझा विवाह झाला. मला पाच वर्षांचा एक मुलगा आहे. दारूच्या व्यसनामुळे पूर्णपणे वाया गेलेल्या माझ्या नव-या चा मुलाच्या भवितव्यावर वाईट परिणाम होऊ नये यासाठी त्याच्यापासून वेगळं होण्याशिवाय माझ्यासमोर दुसरा कोणताही पर्याय नव्हता. मी सुशिक्षित आहे व एका मोठ्या खासगी कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत आहे. जोपर्यंत आमचा घटस्फोट झाला नव्हता तोपर्यंत ऑ फिसमधील बहुतेक सर्व सहका-या चे मला चांगले सहकार्य मिळत असे. माझा नवरा दारुडा आहे व घरातील सर्व आर्थिक बाबी मलाच सांभाळाव्या लागतात या कारणाने सर्वांच्या सहानुभूतीचा ओघ सतत माझ्याकडे वळलेला असायचा. मी माझ्या नव-या ला घटस्फोट दिला आणि कार्यालयातील वातावरणात हळूहळू बदल होऊ लागला. ज्या सहका-या ना माझ्याबद्दल सहानुभूती वाटत होती त्यांच्यामध्ये मला ‘मदत’ करण्यासाठी चढाओढ सुरू झाली! नेहमी थोडं अंतर ठेवून अदबीने वागणा-या सहका-या च्या नजरांमध्ये व देहबोलीमध्ये मला श्वापदांचा भास होऊ लागला. मी ज्यांना माणसं समजत होते त्यांच्यातील लांडगे अत्यंत निर्लज्जपणे माझ्या सभोवताली वावरू लागले. सहृदय व सोज्ज्वळ चेह-या मागे लपलेल्या शिका-या पासून मी स्वत:चे संरक्षण कसे करावे याबद्दल योग्य मार्गदर्शन करून माझ्यासारख्या अनेक असहाय स्त्रियांना अशा संकटापासून वाचवण्याचा उपाय सुचवावा ही नम्र विनंती.

पासबुकाची शुभचिंतक, स्वाती
प्रिय स्वाती,
काही दिवसांपूर्वी नॅशनल जि ऑ ग्राफिक या टीव्ही चॅनलवर वाघांच्या जीवनावरील एका कार्यक्रमात एक रानडुक्कर स्वत:चा जीव वाचवण्यासाठी दोन भल्यामोठ्या वाघांना कसे दूरवर पिटाळून लावते हे दाखवले होते. खरं तर दोन वाघ आणि एक रानडुक्कर यांची कोणत्याच बाबतीत तुलना करता येणार नाही. तरीही हा चमत्कार कसा घडला? निसर्गाने प्रत्येक जिवंत प्राण्याला जगण्यासाठी प्रदान केलेली सहजप्रवृत्ती (नॅचरल इन्स्टिंक्ट) अशा चमत्कार वाटण्यासारख्या घटना घडवून आणत असते. कर्तृत्वहीन माणसं स्वत:मध्ये लपलेल्या श्वापदांच्या इच्छापूर्तीसाठी एकट्याने अथवा संघटितरीत्या एखाद्या व्यक्तीवर किंवा कुटुंबावर तुटून पडण्याचा अनेकदा प्रयत्न करत असतात. स्वत:ला पुरुष समजणारी ही माणसं अत्यंत भेकड असतात व अशांची संख्या आजच्या समाजात मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. सरकारी अथवा खासगी उपक्रमांच्या कार्यालयांमध्ये एकट्या स्त्रीला अशा संकटांना अनेकदा तोंड द्यावे लागत असल्यामुळे स्त्रियांनी स्वत:च्या मानसिकतेमध्ये आमूलाग्र बदल करणे अत्यावश्यक आहे. पुरुषाशिवाय या जगात आपण पूर्णपणे एकटे व असहाय आहोत या एका मोठ्या गैरसमजाची मनातून शक्य तितक्या लवकर हकालपट्टी करावी. जमीन भुसभुशीत आहे, अशा गैरसमजातून सरळ कोपराने खणण्याची प्रवृत्ती असणा-या भेकडांना एखादी बाणेदार स्त्री आपल्या जळजळीत नजरेच्या केवळ एका फटक्यात त्याची खरी जागा दाखवू शकते. ‘शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ’ हे लक्षात ठेवून स्वत:च्या समस्या सोडवण्यासाठी युक्तीच्या शक्तीचा व स्त्री-शक्तीचा भरपूर उपयोग करून निर्भयपणे जीवन व्यतीत करावे.

shrikantpohankar@gmail.com