आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रथा व शास्त्रीय कारणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साधारण पन्नाशीच्या पुढे असलेल्या महिला आणि तरुण पिढीत पाळीच्या दिवसातील प्रथांवरून नेहमी वाद होतात. मात्र तरुण पिढीनेही याबाबत आई, आजीशी निव्वळ भांडण करून काहीच घडणार नाही. या पद्धतींमागील तत्कालीन शास्त्रीय कारणे शोधून काढल्यास वर्तमानात त्या कितपत लागू पडतात याचा प्रत्यक्ष उलगडा होऊ शकेल.
— त्या दिवसांत डोक्यावरून अंघोळ करू नये
हल्ली भरपूर पाणी असलेली ऐसपैस आणि सुरक्षित बाथरुम्स असतात. सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर केला जातो. ते सहज बदलता येतात. पण पूर्वी अंघोळ करण्यासाठी बाथरूम नव्हते. नदी, तलाव, विहिरी यासारख्या सार्वजनिक ठिकाणी किंवा घरातील अर्धवट उघड्या मोरीत अंघोळ करावी लागत असे. तसेच त्या काळी निकरदेखील घातल्या जात नव्हत्या. पाळीच्या दिवसात सर्रास कापडाचा वापर केला जात असे. त्यामुळे अशा अवस्थेत अंघोळ आणि तीही डोक्यावरून, करणे किती कठीण बाब होती, याची कल्पना आपण करू शकतो.
— देवाची पूजा नाही, मूर्तिस्पर्श नाही
घरातील देवपाट, मंदिर किंवा तीर्थक्षेत्रे नेहमीच पवित्र समजली जातात. त्यामुळे देवपाटाजवळील जागा नेहमीच स्वच्छ ठेवली जाते. पूर्वी ग्रामीण भागातील घरे मातीने सारवलेली असायची. त्यामुळे पाळीच्या दिवसात जमिनीवर बसल्याने खाली ओल लागत असे. रक्तस्रावाच्या दुर्गंधीमुळे किडे, कीटकही लागायचे. त्यामुळे या दिवसात महिलांनी देवघरासमोर बसू नये, असा नियम होता. पण हल्ली घरातील फरशी आणि सॅनिटरी नॅपकिन्सच्या वापरामुळे यापैकी काही घडू शकत नाही. देवघराप्रमाणेच स्वयंपाकघरातील निषिद्धीमागील हेच कारण होते.
— पुरुषांपासून लपवून ठेवणे
तज्ज्ञांच्या मते, पाळी ही प्रक्रिया केवळ महिलांबाबत घडत असल्यामुळे पूर्वीच्या काळी पुरुषांना याबाबतीत प्रचंड उत्सुकता असायची. केवळ पुरुषांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देणे टाळण्यासाठी त्यांच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली जात असे. पूर्वीच्या काळी महिलांना शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्याची फार मुभा नसे, त्यामुळे महिलाही याबाबतीत खोलवर चर्चा करण्यास तयार होत नसत.
— घराबाहेर न पडणे
सॅनिटरी नॅपकीनसारख्या सुरक्षित साधनांचा अभाव, स्वच्छता राखण्यासाठीच्या साधनांचा अभाव, जागृतीचा अभाव.