आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च अंतर्गत असणार्या होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन, मुंबई येते उपलब्ध असणार्या विज्ञान शिक्षण विषयातील संशोधनपर पीएचडीसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार बीएस्सी असावेत व त्यांनी एमएस्सी, एमएसडब्ल्यू किंवा बीटेक, बीई, एमबीबीएस वा तत्सम पात्रता घेतलेली असावी आणि त्यांना विज्ञान विषयातील संशोधनाच्या जोडीलाच शालेय व महाविद्यालयीन स्तरावर विज्ञान शिक्षणाची आवड असायला हवी.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल व त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई व पुणे या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल.
निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणार्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची निवड करणात येईल.
पाठ्यवृत्ती व फायदे : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 16,000 ते 18,000 रु. पाठ्यवृत्ती देण्यात येईल. याशिवाय त्यांना त्यांच्या संशोधन कलावधीसाठी आकस्मिक खर्चापोटी वार्षिक 20,000 रु. व निवास व्यवस्था यासारखे फायदे पण उपलब्ध होतील.
अर्जासह पाठवायचे शुल्क : अर्जदारांनी आपल्या अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून आपल्या अर्जासह 350 रु.चा होमी भाभा सेंटर फॅर सायन्स एज्युकेशन यांच्या नावे असणारा व मुंबई येथे देय असलेला डिमांड ड्राफ्ट पाठविणे आवश्यक आहे.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनच्या दूरध्वनी क्र. 022-25580036 वर संपर्क साधावा. अथवा सेंटरच्या http://www.hbsce.tifr.res.in/graduate-school/examinfo/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने http://www.hbsce.tifr.res.in/downloads/ या संकेतस्थळावर अर्ज करून त्याची प्रत आवश्यक त्या डिमांड ड्राफ्टसह होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, वि. ना. पुरव मार्ग, मानखुर्द, मुंबई 400088 या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2013.
विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी वा वैद्यकशास्त्र यासारख्या ज्या पात्रताधारकांना विज्ञान, शिक्षण- संशोधन क्षेत्रात आपले करिअर करायचे असेल त्यांनी या संधीचा जरूर फायदा घ्यावा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.