आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोटो व्हिडिओ अपलोड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुमच्याकडे डिजिटल कॅमेरा, कॅमकॉर्डर किंवा मोबाइल असेल तर तुम्ही तुमची छायाचित्रे आणि चलचित्र इंटरनेटवर अपलोड करून तुमच्या अनेक मित्रांबरोबर शेअर करू शकता. आजकाल फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यासाठी अनेक सॉफ्टवेअर्स आहेत. त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचणे खूपच सोपे झाले आहे; परंतु असे करण्याआधी त्यांचे प्रायव्हसीचे नियम तपासणे अतिशय गरजेचे आहे. जगभरातून लोकांनी 10 बिलियन फोटो फक्त एकट्या फेसबुकवर अपलोड केले आहेत. यूट्यूबवरही 24 तासांतल्या प्रत्येक मिनिटाला व्हिडिओ अपलोड होत असतो.
बहुतेक साइट्सवर फोटो आणि व्हिडिओ अपलोड करायची पद्धत सोपीच असते. कदाचित पद्धतीत फरक असेल, पण साधारण प्रक्रिया सारखीच असते. साधारणपणे ‘अपलोड फोटोज’ लिंक असते, त्यावर क्लिक केल्यावर एक किंवा अधिक रिकामे बॉक्स येतात. तुम्ही मग तुमच्या संगणकावरून शोधून प्रत्येक बॉक्ससाठी फोटो निवडता. सरतेशेवटी निवडून झाल्यावर ‘अपलोड’ क्लिक करता आणि फोटो वेबवर अपलोड होतात. व्हिडिओज अशाच प्रकारे अपलोड केले जातात. काही साइट्सवर एका वेळेस अनेक फोटो अपलोड करता येतात. काही साइट्सवर अपलोड झाल्यावर निवडक ई-मेल अ‍ॅड्रेसला फोटो पाहण्यासाठी निमंत्रण पाठवायची सोय असते. काही साइट्सवर अशी सोय असते की, तुम्हाला जो फोटो/इमेज अपलोड करायची आहे त्याचा वेबपत्ता (URL) द्यायचा की त्यावरून तो फोटो सहज अपलोड होतो. तुमचा एखादा अल्बम ऑनलाइन असेल आणि तेच फोटो तुम्हाला सोशल नेटर्वकिंग साइटवर अपलोड करायचे असतील तर ही सेवा खूपच सोयीची पडते.
काही साइट्स अशा डिझाइन केलेल्या असतात की ज्यावरून बुलेटिन बोर्ड, ब्लॉग्ज, इ-बे किंवा ट्विटरवर फोटो अपलोड करता येतात. बहुतेक साइट मोफत सेवा देतात, परंतु जागा साठवणीसाठी (hosting) आणि अधिक वेगळ्या सुविधांसाठी शुल्क आकारतात.
फेसबुक आणि मायस्पेसचा उपयोग फोटो आणि व्हिडिओ शेअरिंगसाठी केला जातो. इतर लोकप्रिय साइट्स आहेत फ्लिकर, फोटोबकेट, पिकासावेब आणि इमेजशॅक. व्हिडिओसाठी लोकप्रिय साइट्स आहेत यूट्यूब, मेटाकॅफे, व्हिमिओ (Vimeo
) आणि व्हिओ (Veoh
). यूट्यूबवर तुमच्या वेबकॅमवर शूट केलेला व्हिडिओ सहजपणे अपलोड करण्याची सोय आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ ब्लॉग सुरू करूशकता. यूस्ट्रीम आणि जस्टइन टीव्ही या साइट्स तुम्हाला थेट टीव्ही प्रक्षेपण दाखवतात.
अपलोडसाठी साइट निवडताना तुम्ही तपासायला हवे की, काय अपलोड करता येते, कोणत्या सेवासुविधा उपलब्ध आहेत आणि प्रायव्हसी कंट्रोल्स काय आहेत. उदा. तुम्हाला तुमचे फोटो प्रायव्हेट ठेवायचे आहेत किंवा काही खास मित्रांबरोबरच शेअर करायचे आहेत. अजून एक लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे, तुमच्या कॅमे-यात जरी उच्च प्रतीच्या high resolution
इमेज असल्या तरी या साइट्सवर कमी प्रतीच्याच इमेज सेव्ह केल्या जातात. मोठ्या साइजच्या इमेज अपलोड करायला वेळ आणि जागा जास्त लागत असल्याने छोट्या इमेज अपलोड करणे केव्हाही चांगले. व्हिडिओ साइट्स व्हिडिओ वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये अपलोड करू देतात व लोकांना बघण्यासाठी मात्र वेगळ्या फॉरमॅटमध्ये अपलोड करतात. आपली गरज ओळखून अशी साइट निवडा की, तुम्हाला तुमचे फोटो आणि व्हिडिओ पाहिजे तेव्हा डाउनलोड करता येतील.