इच्छाशक्तीनेच भाषा जतन / इच्छाशक्तीनेच भाषा जतन

- पीयूष नाशिककर

Mar 24,2017 03:58:00 AM IST
महाराष्ट्राबाहेरील मराठी लाेकांची भाषा, साहित्य व संस्कृतीचे बृहन्महाराष्ट्रात जतन, संवर्धन अाणि संरक्षण करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची गरज असून ती निर्माण करणे व टिकविणे अाज अतिशय अावश्यक झाले अाहे, अन्यथा पुढच्या पिढीत मराठी भाषेचे बृहन्महाराष्ट्रात अस्तित्व कसे व किती उरेल याबद्दल सांगता येणे कठीण अाहे, अशी खंत प्रख्यात लेखक अाणि भारत सरकारच्या परराष्ट्र विभागाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी व्यक्त केली.
भाेपाळ येथील रवींद्र भवनात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ५६व्या वर्धापनदिन कार्यक्रमाचे अायाेजन करण्यात अाले हाेते.यावेळी खरे बाेलत हाेते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामंडळाचे अध्यक्ष डाॅ. श्रीपाद जाेशी हाेते. मुळे पुढे म्हणाले की, बृहन्महाराष्ट्रातील मराठी माणसांनी स्वकष्टाने मराठीचे जे जतन अापापल्या राज्यात केले त्यातूनच ही भाषा, साहित्य, संस्कृती तिथे तग धरून मात्र ती पुढे टिकवायची असेल तर त्यांना माेठ्या प्रमाणावर राजाश्रय व वाढता लाेकाश्रय लाभण्याची गरजही त्यांनी विशद केली.
प्रारंभी महामंडळाचे कार्यवाह डाॅ. इंद्रजित अाेरके यांनी वर्धापन दिनाची भूमिका मांडली तर उपाध्यक्ष सुधाकर भाले यांनी प्रास्ताविक केले. अक्षरयात्रा या महामंडळाच्या जागतिकीकरण अाणि मराठी भाषा, साहित्य, संस्कृती या सूत्रावर अाधारित डाॅ. विलास देशपांडे यांनी संपादित केलेल्या वार्षिकांकाचे प्रकाशन तसेच मध्य प्रदेश मराठी साहित्य संघाच्या भाेजपत्र या मुखपत्राचे यावेळी प्रकाशन करण्यात अाले.
शेवटच्या सत्रात डाॅ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली ‘रंग मावळतीचे अाणि उगवतीचे’ हे कविसंमेलन झाले. यात इंदूर, बऱ्हाणपूर, भाेपाळ, देवास, ग्वाल्हेर, बिलासपूर, खांडवा येथील कवींनी सहभाग घेतला. दुसऱ्या दिवशी ‘बृहन्महाराष्ट्रातील मराठी’ या विषयावर एक दिवसभराचे चर्चासत्रही घेण्यात अाले.
अापण विचारत नाही हा अापलाही दाेष
- भाषा, साहित्य, संस्कृती क्षेत्रासाठी राज्य व केंद्रात अंदाजपत्रकाच्या किती टक्के रक्कम केंद्र व राज्य सरकारे खर्च करतात याची विचारणा अापण काेणीच का करत नाही? भाषा, साहित्य अाणि संस्कृती क्षेत्राला विकासाची साधनसामग्रीच राज्यकर्ते मानत नाहीत त्यात त्यांचा दाेष कमी व अापलाच अधिक अाहे. कारण तशी ती मानण्याचा दबावच निर्माण करण्याची इच्छाशक्ती मराठी भाषिक समाज हरवून बसला अाहे.
अापल्या स्वभाषा, स्वसाहित्य, स्वसंस्कृतीबद्दलची ही घाेर उदासीनता लाेकांमध्येच असल्याने त्याच्या विकासासाठी जी राजकीय इच्छाशक्ती निर्माण हाेणे गरजेचे अाहे त्यासाठी अापला दबावच राज्यकर्त्यांवर नसल्याने अापणच अापापल्या भाषा, साहित्य व संस्कृतीचे मारेकरी झालाे अाहाेत. मध्य प्रदेशात हिंदी विद्यापीठ अाहे, मात्र महाराष्ट्रात संस्कृत व हिंदी विद्यापीठ स्थापले जाते. पण गेली ८५ वर्षे सतत पाठपुरावा करूनही मराठी विद्यापीठ मात्र स्थापन केले जात नाही. - डाॅ. श्रीपाद भालचंद्र जाेशी, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

‘निलंबित नवरा?’
एकूण साहित्याच्या प्रवाहात विनाेदी साहित्य कुठेतरी लुप्त हाेत चालले अाहे अशी अाेरड साहित्यविश्वात अाहेच. विनाेदी साहित्याला वाचक किती, रसिक किती अाणि शिवाय हे साहित्य प्रसिद्ध करणारे प्रकाशक किती असाही त्यामागे एक विचार केला जाताे. पण अशा सगळ्या विचारांना फाटा देत लेखक चंद्रकांत महामिने हे सातत्याने विनाेदी साहित्य लिहीत अाहेत अाणि निर्मिती करत अाहेत.
त्यांच्या साहित्य शृंखलेतील ‘निलंबित नवरा’ हे पुस्तक वाचकाचे चांगलेच मनाेरंजन करते. निलंबित नवरा हा एकूण सतरा विनाेदी कथांचा संग्रह अाहे. नागरी व ग्रामीण विनाेदी कथांच्या या संग्रहात मी समावेश केला अाहे. गेल्या काही वर्षांत मुंबई ते चंद्रपूर व्हाया पुणे, धुळे अशा शहरातून प्रकाशित झालेल्या दिवाळी वार्षिक विशेेषांकांतून या कथा प्रसिद्ध झाल्या अाहेत. त्यांना ग्रंथरूपात वाचकांपर्यंत पाेचविण्याचे काम ‘स्वरूपदीप प्रकाशन’ यांनी केले अाहे.
विनाेदी वाङ‌मय प्रकाशत प्रसंगनिष्ठ विनाेद वरच्या दर्जाचा मानला जाताे. या संग्रहातील कथांमध्ये प्रसंगानिष्ठ विनाेदाची अनेक उदाहरणे वाचक नक्कीच अनुभवतील व त्यांचा अास्वाद घेतील. ‘फॅन्टसी’ हादेखील विनाेदाचाच एक प्रकार. गाढवांच्या सभेत मी अाणि इंद्रलाेकी घुसखाेरी या दाेन कथा या फॅन्टसी प्रकारातील अाहेत.
या पुस्तकात एकूण १७ कथा देण्यात अाल्या अाहेत. त्यात बायकाेपेक्षा मांजर बरी, तिला सासरा हवा, गुमचूप प्रेमिक डाॅट काॅम, त्याची प्रेयसी ह्याची बायकाे, माझा अात्मक्लेश प्रयाेग, कलेक्टरिणीचा बाप, ये रे माझ्या मागल्या, बेटा महाबिलंदर, एसीबीची साहित्यिकावर धाड, एकावन्नच्या चक्रव्यूहात, त्याच गावाच्या बाभळी, कुदबा, वाकडं बाेट, बिनहुंड्याचा डाॅक्टर जावई या कथा वाचताना मजा येते.
या सगळ्याच कथा राेजच्या अनुभवातून वा अापल्या अासपासच एखादी घटना घडते अाहेत अशा असल्याने वाचक त्यात रमून जाताे. अत्यंत साध्या-साेप्या बाेली भाषेत या कथा असल्याने तसेच त्या छाेट्या असल्याने रटाळ वाटत नाहीत. म्हणून त्या वाचकाला नक्की भावतात. यातील अनेक कथा या संवादी असल्याने ती पात्रेही वाचकाच्या डाेळ्यापुढे उभी राहतात. काही कथा तर एखादे नाटक बघत असल्यासारखेच वाटते. त्यामुळे वाचकांना महामिने यांचा हा कथासंग्रह नक्कीच अावडेल यात शंका नाही.
X
COMMENT