आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Time management yar... असे करा नियोजन, अफलातून...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैयक्तिक व सामाजिक बाजूचा विचार केला तर वेळेचे नियोजन अतिशय महत्त्वाचे आहे. वेळ पळत असते आणि तिला गाठताना भल्याभल्यांची दमछाक होते. अशा वेळेस अजिबात गांगरून न जाता प्रत्येक स्त्रीने वेळेचं नियोजन करायला शिकून घ्यायलाच हवं. वेळेचं नियोजन करताना सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या कामांच्या उपयुक्ततेच्या किंवा प्राधान्याच्या याद्या कराव्या लागतात. म्हणजे कुठलं काम सध्या अतिशय महत्त्वाचं आहे आणि कोणतं कमी महत्त्वाचं, ते ठरवता यायला हवं. आज साठ ते सत्तर टक्के स्त्रिया नोकरी करतात. ती सांभाळताना अनेक कौटुंबिक जबाबदा-याही त्यांना पार पाडाव्या लागतात. उदा. स्वयंपाक, मुलांचा अभ्यास, घरची किरकोळ कामे करणे, साफसफाई वगैरे. ते करताना वेळेचे नियोजन साधता येत नाही अशी अनेक स्त्रियांची तक्रार असते. कामांची उपयुक्तता एकदा नीट लक्षात घेतलीत तर तुम्हाला ते जमू शकेल. तुमच्या कामाच्या प्रेशरचा परिणाम कोणत्याही परिस्थितीत तुमच्या खासगी आयुष्यावर आणि आरोग्यावर होता कामा नये हे लक्षात घ्या. गरज भासल्यास पतिराजांनाही काही कामांमध्ये सहभागी करू शकता. आर्थिक परिस्थिती उत्तम असेल तर पगारी नोकर-मोलकरीण ठेवून तुम्ही कामांचे डेलिगेशन करून इतर महत्त्वाच्या कामांचे नियोजन करू शकता.

दुस-या दिवशी करावयाच्या कामांची एक साधारण यादी मनात आदल्या दिवशी तयार करावी, त्याची क्रमवारी ठरवून ठेवावी. त्याबरहुकूम थोडं लवकर उठून तुम्ही कामांना सुरुवात केलीत तर कामं लवकर संपतात. सकाळी जरा लवकर उठल्यानंतर मुलांचे सर्व आटोपून त्यांचा डबा करून, घरची कामे आटोपून, साधारण साडेअकरा-बाराला मोकळ्या होणा-या अनेक स्त्रिया माझ्या माहितीत आहेत. तसं करता यायला हवं. नियोजनातील मूळ शब्द योजना हा आहे. कमी महत्त्वाच्या कामांची विभागणी सर्वात शेवटी करून महत्त्वाची कामे आधी करावीत. बँकेची कामे, वीजबिल भरणे किंवा तत्सम बाहेरची कामे करण्यासाठी 15 दिवसातून एक दिवस राखून ठेवावा. वेळेच्या नियोजनामुळे तुम्हाला 10-15 दिवसांतून एखादा दिवस फक्त आरामाचाही ठेवता येईल.