आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टिक व पॉलिमर शाखेतील करिअर संधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंजिनिअरिंग शाखेत प्रवेश घेताना नेहमी चर्चिला जाणार्‍या विषयात म्हणजेच मेकॅनिक, कॉम्प्युटर, आय.टी., इलेक्टॉनिक्स इत्यादी. शाखेत प्रवेश मिळेल का याचीच चिंता लागलेली असते. पण इतरही काही शाखा आहेत ज्याची चर्चा होत नाही, पण तितकीच महत्त्वाची आहेत. असाच एक विषय म्हणजे प्लास्टिक आणि पॉलिमर इंजिनिअरिंग. प्लास्टिक / पॉलिमरचा वापर हे राष्ट्राच्या प्रगतीचे एकक म्हणून गणल्या जात आहे.

21 व्या शतकात असे कोणतेही क्षेत्र नाही की जिथे प्लास्टिक / पॉलिमरचा वापर होत नाही. म्हणून प्लास्टिक / पॉलिमरचा वापर सतत वाढतच जात आहे. त्यामुळे स्वत:च्या व्यवसायाच्या संधी तर आहेतच शिवाय नोकर्‍यादेखील खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.
व्यवसाय व करिअरच्या संधी :

1. पॅकेजिंग / वेष्टनचे क्षेत्र - हे सतत वाढतच जाणारे क्षेत्र. यात साध्या कॅरिबॅगपासून ते निरनिराळ्या प्रकारच्या बाटल्या, मायक्रो ओव्हनमध्ये ठेवता येणारे बंद डबे, रक्त साठवू शकणार्‍या पिशव्या इत्यादी क्षेत्र आहेत.
या क्षेत्रात संशोधन करण्यास खूप वाव आहे. कारण आज आम्ही बंद डब्यातील किंवा पॅक्ड वस्तूच खरेदी करतो. कारण त्यात एक तर भेसळ नसते व वजन पण त्या वेष्टनावर दिलेले असते.

2. ऑटोमोटिव्ह - सध्या बाजार उपलब्ध असणारे स्कूटर्स, मोटार सायकल व चारचाकी गाड्या यांचे वजन दिवसेंदिवस कमी कमी होताना दिसत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे त्यातील धातूचे पार्ट बदलून त्या ठिकाणी प्लास्टिकचे पार्ट टाकले जात आहेत. साधारणत: यात 30 ते 40 टक्के इतका प्लास्टिकचा वापर होताना दिसतो.

3. इलेट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स - वायरवरील प्लास्टिकचे आवरण हे खूप महत्त्वाचे आहे. ऑप्टिकल फायबरचा उपयोग तर टेलिकम्युनिकेशनमध्ये तर प्लास्टिकच सारखे वाढत आहे. प्रिंटेड सर्किट बोर्ड तर प्लास्टिकच असतात.

4. शेतीत प्लास्टिकचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसतो आहे. उदा. प्लास्टिक पाइप, क्रेटर-ग्रीन हापूससाठी प्लास्टिकची जाळी, प्लास्टिक फिल्म इत्यादी.

5. वैद्यकीय क्षेत्रात तर प्लास्टिक / पॉलिमरचा संचार खूप मोठ्या प्रमाणात दृश्य व अदृश्य स्वरूपात होत आहे. उरा, इंजेक्शन सिरिंज, निरनिराळ्या प्लास्टिकच्या नळ्या ज्या फक्त सलाइन व रक्त देण्यासाठीच वापरल्या जात नाहीत तर पोटातील विकार, अन्न देण्यासाठीदेखील त्याचा वापर होताना दिसतो. कृत्रिम दात व कानातील यंत्र हे प्लास्टिकचेच असतात.

6. खेळ-खेळाची मैदाने प्लास्टिक वापरून केली जातात. खेळाचे बूट, स्केटिंग व स्किइंगसाठी लागणारे साहित्य प्लास्टिकपासून तयार करतात.

7. बुलेटप्रूफ जॅकेट पॉलिमर वापरूनच करतात. प्लायवूड, निरनिराळ्या प्रकारचे फोमस, वेगवेगळ्या प्रकारचे अ‍ॅटेसिव्ह तर पॉलिसरच असतात. संरक्षण दलात प्लास्टिक / पॉलिमरने तर क्रांतीच केली आहे. रोजच्या वापरात तर अगणित वस्तू या प्लास्टिक पॉलिमरच्या पाहावयास मिळतात. निर्लेप भांड्यावरील थर पॉलिमरचा असतो. असे म्हटल्यास वावगे होणार नाही.

पेंटचा मुख्य घटक पॉलिमरच असतो. ओरखडे न जाणारा पेंट, रात्री थोड्या प्रकाशात चमकणारा पेंट, ऊष्णता शोषून घेणारा पेंट, इत्यादी अगणित प्रकारचे पेंट बाजारात उपलब्ध झाले आहेत.
शिक्षणाच्या संधी
1. एम.आय.टी. औरंगाबाद
2. सिपेट, औरंगाबाद
3.college of engineering and tech. akola
4. एल.आय.टी. नागपूर
5. एमआयटी पुणे
6. एनएमयू जळगाव
7. सोलापूर विद्यापीठ
8. आय सी टी मुंबई
9. g.poly. नाशिक
10. g.poly.अमरावती
11. g.poly.मिरज
12. भागुबाई मफतलाल, मुंबई
13. वाडिया कॉलेज, पुणे
14.२. s. i.e. school of packging, मुंबई.
15. i.p. i मुंबई
16. b.a.t.u. लोणारे

कारखान्यातील करिअर
1. इंजेक्शन मोल्डिंग
2. एक्सटूजन मोल्डिंग
3. ब्लो मोल्डिंग
4. कॉम्प्रेशन मोल्डिंग
5. थर्मो फॉर्मिंग
6. रोटेशनल मोल्डिंग
7. टू रोल मिल
8. पेंट तयार करणारे कारखाने
9. अ‍ॅडेसिव्ह तयार करणारे कारखाने
10. सेलो टेप तयार करणारे
11. मोल्ड/प्रॉडक्ट डिझाइन
12. मशीन मॅन्युअरर्स
13. टायर इंडस्ट्री
14. लेदर इंडस्ट्री इत्यादी.