फुकटात खेळा मजेदार / फुकटात खेळा मजेदार गेम्स ऑ

दिव्य मराठी

Apr 20,2012 10:18:52 PM IST

अल्लाउद्दीनच्या दिव्याची गोष्ट तुम्ही ऐकली असेलच. जेव्हा जेव्हा तो दिवा घासायचा तेव्हा त्यातून राक्षस निघायचा, तो अल्लाउद्दीनची इच्छा पूर्ण करायचा.
आता मोबाइल फोन जवळपास अल्लाउद्दीनच्या दिव्यासारखेच झाले आहेत. तुम्ही याचा वापर करून आपली इच्छा पूर्ण करू शकता. राक्षसाची भूमिका आता अ‍ॅप्लिकेशन्स करणार आहेत. त्यामुळे युजर्सना अधिकच स्मार्ट बनवण्यास मदत होत आहे. आम्ही येथे तुमच्यासाठी जादूमयी दुनियेतील मोबाइलचे काही खास अ‍ॅप्लिकेशन्स आणले आहेत, यामुळे आपले जीवन अत्यंत रोमांचक आणि आनंदी बनेल.
महत्त्वाचे - तुमच्या फोनमधील फोटो गॅलरीत असणारे फोटो किंवा मोबाइल कॅमे-यातून काढलेले फोटो फेटबूथवर शेअर करू शकता. अ‍ॅप्लिकेशनची खुबी अशी आहे की, फोटोमधल्या चेह-यातील हिस्सा आपोआप छाटल्या जातो. चेहरा बदलल्यानंतर अ‍ॅप्लिकेशन्स गॅलरीत दिसू लागतो. त्याला फोटो गॅलरीत सेव्ह करून ठेवता येते. तो ई-मेलद्वारेही कोणाला पाठवू शकता.
लक्षात घ्या, फेटबूथचा अर्थ केवळ मौजमस्ती आहे. कोणाचा चेहरा बिघडवून त्यांना अडचणीत आणणे किंवा बदनाम करणे असा हेतू नसावा.
किंमत : मोफत
अधिक माहितीसाठी डाऊनलोड करा -
https://play.google.com/store/apps/details?id=com.piviandco.fatbooth
फोनवर बनवा ‘फनी’ फोटो - दोस्तांसोबत काही मजेदार चुटकुले, थट्टा-मस्करी होऊन जाऊ द्या! चुटकीसरशी तुम्ही दोस्तांचे वजन घटवू किंवा वाढवू शकता. आयफोनसाठी फेटबूथ या नावाचे अत्यंत आवडते अ‍ॅप्लिकेशन वापरात आले आहे. ते अँड्रॉइडसाठीही वापरता येते. यात आपल्या मित्रांचे किंवा भाऊ-बहिणींचे फोटो घ्या. त्या फोटोवर या अ‍ॅप्लिकेशनचे बटन क्लिक करा आणि पाहा... त्यांचे मजेदार चित्र! हे पाहून सर्वांनाच हसू फुटेल! या फोटोला फेसबुकवर किंवा ट्विटरवर शेअर करू शकता

X
COMMENT