आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कविता आठवणीतील

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हवेत नितांत अनपेक्ष
उचलली जाते लेखणी.
सगळ्याच आत्मनेपदावर
काट मारली जाते.
कागदावर ठिबकलेला
शाईचा ठिपका विस्तारत जातो.
सहजगत्या - हवेत :
आता कशाचाच नाही अवसाद
निरव, आता हवेत
धुके सघन झाले. सहसा.
क्षणात.अमाप कणात : इथंतिथं.
पडले अगम्य आभाळ,
अजस्त्र. आता हवेत
आकंठ जलाशय होऊन
हिन्कळतोय श्वास,
क्षणात राहून राहून.
अडकून गेले सगळे मार्ग
सतत घुसणा-या हवेत
अखेर समतल सगळे उतार
दूरचे - सगळे दूरचे - फिरफिरून.