आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कविता प्रज्ञासूर्याच्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जो प्रज्ञावंत समाज मागे वळून बघतो, आपल्या वाटचालीचे योग्य परिशीलन करतो त्याचे भविष्य प्रकाशमयी असते. धर्माच्या फडतूस नावावर नाडवून एका चिमूटभर उपऱ्या समूहाने संख्येने मोठ्या असलेल्या मानवी समाजाचे अतोनात शोषण केले. त्यांचे जीवनच गोठवून टाकले अन् अपमानित जीवन जगण्यास भाग पाडले. मात्र, अन्यायाची जेव्हा सीमा होते, तेव्हा विद्रोह होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तो विद्रोह फेकलेल्यांकडून घडवून आणला आणि मजलूमाच्या जीवनाचे सोने झाले.
त्या महामानव डॉ. बाबासाहेबांची ही १२५ वी जयंती.
या निमित्ताने मागे वळून बघणाऱ्या
कवी लोकनाथ यशवंत यांनी संकलित
केलेल्या या काही कविता...

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर उर्फ बाबासाहेब

असंख्य माणसांचा तप्त समूह
मुख्य रस्त्यावर लोटासारखा आला.
त्यांनी शहरातील सगळे पुतळे तोडायला सुरुवात केली.
कुणाचे डोके फोडले, कुणाला नेस्तनाबूत केले,
कुणाला लोळवले, काहींना विद्रूप केले
शेवटच्या क्षणी, ते माझ्या पुतळ्याजवळ आले.
--------------
क्रुद्ध समूहातील एक संथ पावलाने समोर आला
आणि अल्प श्रमाने त्याने माझे दिशा दाखविणारे बोटच तोडले.

- लोकनाथ यशवंत
पुढील स्लाइडमध्ये वाचा, महामानवासोबत स्वतःचेही परीक्षण करणाऱ्या कविता