आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदरावरील वाहतूक 29 % दराने वाढली, 6 हजार मर्चंट नेव्ही कर्मचाऱ्यांची गरज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मर्चंट नेव्ही (व्यापारी नौदल) हे व्यापारी जहाजाचे दल असून माल आणि प्रवाशांच्या सागरी वाहतुकीसाठी काम करते. एका देशातून दुसऱ्या देशात व्यापारासाठी समुद्रीमार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. सागरी व्यापारात मर्चंट नेव्हीची भूमिका महत्त्वपूर्ण असते. हे दल व्यापारी जहाजांच्या प्रत्येक हालचालीस जबाबदार असते. यात विविध कामांसाठी मनुष्यबळाची नियुक्ती केली जाते. 
 
मागील काही वर्षांमध्ये देश-विदेशांत वाढत्या व्यावसायिक घडामोडींमुळे मर्चंट नेव्ही मनुष्यबळाची मागणी वाढली आहे. सध्या या दलात ६० हजार अधिकाऱ्यांची गरज आहे. जहाज वाहतूक मंत्रालयानुसार, आयाताच्या दृष्टिकोनातून ९५ टक्के आणि किमतीच्या बाबतीत ७० टक्के देशांचा व्यापार सागरी मार्गाने होतो. 
 
असोचेमच्या एका अहवालानुसार, २०१६-१७ मध्ये देशातील निर्यात ३२ टक्क्यांनी वाढली आहे. यात शेती आणि त्याच्याशी संबंधित क्षेत्राची भूमिका महत्त्वाची आहे. देशात १२ मोठी आणि २०० लहान बंदरे आहेत. २०१५ च्या अखेरपर्यंत मालवाहतूक १ हजार ५२ दशलक्ष मेट्रिक टन हाेती. २०१७ च्या अखेरपर्यंत ती १ हजार ७५८ दशलक्ष मेट्रिक टन होण्याची शक्यता आहे. मोठ्या बंदरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्याही उद््भवली. बंदरातील वाढत्या व्यापारी घडामोडी आणि त्यांच्या विकासासाठी मर्चंट नेव्हीची गरज अधिकच भासू लागली आहे. देशातील वाढते आंतरराष्ट्रीय व्यापारसुद्धा यामागील एक कारण असू शकते. त्यामुळे युवकांसाठी हे क्षेत्र चांगला पर्याय ठरू शकते. मर्चंट नेव्हीमध्ये बहुतांश कंपन्या करारानुसार नोकरी देतात. हा करार ६ ते ९ महिन्यांचा असतो. काही वर्षांपूर्वी हे क्षेत्र फक्त पुरुषांसाठीच योग्य मानले जात होते. मात्र, आता ही मानसिकता बदलली असून महिलांसाठीही रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत.  मर्चंट नेव्हीत कॅप्टनसोबतच चीफ ऑफिसर, सेकंड ऑफिसर, थर्ड ऑफिसरची सुरक्षा आणि जबाबदारीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण भूमिका असते. सोबतच मरीन इंजिनिअर, फिफ्थ इंजिनिअर, ज्युनियर इंजिनिअर, रेडिओ ऑफिसर, नॉटिकल सर्व्हेअरसारख्या पदांसाठीही प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता असते. आंतरराष्ट्रीय व्यापाराची जवळपास संपूर्ण जबाबदारी मर्चंट नेव्हीचीच असते. त्यामुळेच जहाजांच्या क्रियान्वयनासाठी अत्यंत प्रशिक्षित व्यावसायिकाची गरज असते. तथापि, यामध्ये विविध प्रकारची आव्हानेही असतात. उदा- दीर्घकाळ समुद्रात राहावे लागते. म्हणून वातावरणानुसार बदलावे लागते. अशा नोकरीत संघभावनाही अत्यंत महत्त्वाची असते.  
 
बारावीनंतर करता येते नोकरी  
विज्ञान शाखेतील विद्यार्थी या क्षेत्रात येऊ शकतात. त्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह बारावी उत्तीर्ण केलेली असावी. शिवाय, बारावीत संबंधीत विद्यार्थ्यास किमान ६० टक्के गुण असावे. त्याचे वय १७ ते २५ वर्षांदरम्यान असायला हवे. पात्रतेची अट पूर्ण करणारे विद्यार्थी आयएमयू प्रवेशपूर्व परीक्षेच्या माध्यमातून डेक कॅडेट्स बनू शकतात.  मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा नॉटिकल सायन्समधून बीई, बीटेक किंवा बीएस्सी करणारे विद्यार्थी कॅडेट, फिफ्थ, मरीन किंवा कनिष्ठ अभियंत्याच्या रूपात काम करू शकतात. या विद्यार्थ्यांना तंदुरुस्ती चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.  
 
बातम्या आणखी आहेत...