आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Post Graduat Syllabas In Agricultur Management Admission 2013 2014

कृषी व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम 2013-2015 साठी प्रवेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकनॅशनल अकादमी ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च मॅनेजमेंट (एनएएआरएम), हैदराबाद येथे उपलब्ध असणा-या कृषी व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या 2013-2015 या शैक्षणिक सत्रात प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थी- उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी कृषी, कृषी अभियांत्रिकी, कृषी व्यवस्थापन, कृषी विपणन व सहकार, दुग्धोत्पादन, मत्स्यपालन, अन्य प्रक्रिया, वन विकास व व्यवस्थापन, फलोत्पादन, पशुवैद्यक यासारख्या विषयातील पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्याशिवाय विद्यापीठ अनुदान आयोग किंवा भारतीय कृषी संशोधन परिषदेतर्फे घेण्यात येणारी कॉमन एंट्रन्स टेस्ट 2012 ही प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.

विशेष सूचना : जे विद्यार्थी, उमेदवार यंदा वर नमूद केल्याप्रमाणे असणा-यापदवी पात्रता परीक्षेला बसणार असतील तेसुद्धा या अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज करू शकतात, मात्र त्यांनी इतर पात्रतेची पूर्तता करणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना त्यांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांकाच्या आधारे समूह चर्चा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येईल. अभ्यासक्रमासाठी निवडक 30 विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात येईल.
अधिक माहिती व तपशील : अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी नॅशनल अकादमी ऑफ अ‍ॅग्रिकल्चर रिसर्च मॅनेजमेंट, हैदराबादच्या www/naam.ernet.in/pgdma या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि तपशिलासह असणारे अर्ज जॉइंट डायरेक्टर अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अ‍ॅण्ड रजिस्टार, नॅशनल अकादमी ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च मॅनेजमेंट (एनएएआरएम), राजेंद्रनगर, हैदराबाद-500 030 या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2013.
कृषी वा संबंधित क्षेत्रातील पदवी पात्रताधारकांना याच विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासह आपले करिअर करायचे असल्यास त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम फायदेशीर ठरू शकतो.

dattatraya.ambulkar@gmail.com