Home | Magazine | Divya Education | post graduate opportunity in Australian university

आॅस्ट्रेलियन युनिव्हर्सिटीत पीजीसाठी मोठी संधी

दिव्य मराठी | Update - Oct 26, 2015, 03:00 AM IST

अशोक खुराणा युनिव्हर्सिटी आॅफ अ‍ॅडिलेड स्काॅलरशिप, आॅस्ट्रेलियात शिकण्यासाठी आर्थिक मदतीचा एक मोठा आधार आहे.

 • post graduate opportunity in Australian university
  अशोक खुराणा युनिव्हर्सिटी आॅफ अ‍ॅडिलेड स्काॅलरशिप, आॅस्ट्रेलियात शिकण्यासाठी आर्थिक मदतीचा एक मोठा आधार आहे. हा स्काॅलरशिप युनिव्हर्सिटी आॅफ अ‍ॅडिलेडमधून पूर्ण वेळ पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यास इच्छुक भारतीय विद्यार्थ्यांना दिली जाते. यासाठी फक्त तेच विद्यार्थी अर्ज करू शकतात, ज्यांच्याजवळ युनिव्हर्सिटीचे अनकंडिशनल आॅफर आहे.

  खालील विषयांत पूर्णवेळ पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्समध्ये अ‍ॅडमिशन घेणार्‍या विद्यार्थ्यांनाच ही स्काॅलरशिप देण्यात येईल.
  - शिक्षण
  - कृषी (फूड सिक्युरिटी आणि वाइनचाही समावेश)
  - हेल्थ सर्व्हिसेस (बायोटेक्नाॅलाॅजीचाही समावेश)
  - क्लीन टेक्नाॅलाॅजी
  - एन्व्हायर्नमेंट (अर्बन प्लॅनिंग आणि आर्किटेक्चरचाही समावेश)
  - एअरोस्पेस
  - रिसोर्सेस वा स्काॅलरशिप दाता आणि युनिव्हर्सिटीद्वारे स्वीकृत एखादा अन्य प्रोग्राम.

  स्कॉलरशिप रक्कम
  या स्काॅलरशिपसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २५,००० डाॅलर देण्यात येतील. त्यात प्रवासाचा खर्च, राहण्याचा खर्च आणि ट्यूशन फीसचा समावेश आहे. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना आपल्या प्रोग्रामच्या एक वर्षाची ट्यूशन फीसवर ५० टक्क्यांची सूटही देण्यात येईल.

  निवड
  स्काॅलरशिपसाठी उमेदवाराची निवड दोन टप्प्यांमध्ये होईल. पहिल्या टप्प्यात उमेदवाराची अकॅडमिक मेरिट पाहिली जाईल. दुसर्‍या टप्प्यात पर्सनल स्टेटमेंट पाहून उमेदवाराची लीडरशिप क्वाॅलिटी आणि कोर्स पूर्ण केल्यावर देशाच्या विकासात सहभागी राहण्याचा उद्देश जाणून घेतला जाईल.

  कसा कराल अर्ज?
  आॅस्ट्रेलियात उच्च शिक्षणासाठी इच्छुक उमेदवार या स्काॅलरशिपसाठी युनिव्हर्सिटी आॅफ एडिलेडच्या वेबसाइटवर आॅनलाइन अर्ज करू शकतात.

  अशोक खुराणा युनिव्हर्सिटी
  आॅफ एडिलेड स्काॅलरशिप
  अर्जाची शेवटची तारीख
  २० नोव्हेंबर २०१५
  www.international.adelaide.edu.au/

Trending