आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prachi Pathak Article About Walking Around Chinchwad

चालत चिंचवड!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाहनांच्या गर्दीत आपण चालायचेच विसरलोय की काय, असं वाटत असेल तर हा लेख वाचून पायी हिंडायला बाहेर पडावंसं नक्की वाटेल तुम्हाला.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि भरपूर चालणे, या दोन्ही प्रकारे एकटीने प्रवास करायची वेगळीच मजा असते. चिंचवडला अशा प्रकारे फिरायचे ठरले! त्यासाठी नेटवरून आणि फेसबुकवरून आधी थोडा होमवर्क केला, तिकडे काय काय बघायचे आहे, याचा! एक यादी तयार झाली. कॅमेरा, पाणी आणि थोडा पौष्टिक खाऊ घेऊन बाहेर पडले.
पुण्यातील दांडेकर पूल येथून निगडीची बस पकडली. थेट चिंचवड स्टेशनला उतरले. तिकीट पंचवीस रुपये. तिथून दहा रुपयांत चापेकर चौकात दुसऱ्या बसने गेले. काही कामे उरकली, जी कधीची ‘एकदा येईन तेव्हा’ म्हणून साचून राहिली होती! एव्हाना बारा वाजले. चिंचवडची प्रसिद्ध नेवाळे मिसळ साडेबाराला बंद होते. म्हणून सव्वा बाराला चालत तिथे गेले. वाटेतच भेटलेल्या एका मुलीने तिथवर चालत सोबत केली. तिने खूप छान रस्ते समजावून सांगितले. तिला
एक ओरिगामी मॉडेल तिथेच बनवून भेट दिले. मग पोटपूजा केली.
या परिसरात आसपास पब्लिक टाॅयलेट नाही. पुरुषांसाठी मुताऱ्या नाही म्हणायला एखाद-दोन दिसल्या. पण स्त्रियांसाठी अजूनही अशा मूलभूत आणि स्वच्छ सुविधा फार कमी ठिकाणी सापडतात. शेवटी मोरया गोसावी मंदिराकडे चालत गेले. इथे रस्त्यात टाॅयलेट दिसले. पण ते अतिशय घाण होते. अगदीच अडचणीत बायका वापरू शकतात पण! नेवाळे मिसळ बंद झालीच, तर कवी यांची बालाजी मिसळ मोरया गोसावीच्याच जवळ आहे. मोरया गोसावी दुपारी
गर्दी नसताना छान वाटते.
तिथली माहिती वाचली सर्व. ते पवना नदीच्या काठी आहे. चिंतामणी समाधी पाहिली. हे चिंतामणी म्हणजे मोरया गोसावी यांचे पुत्र. रामदास आणि तुकाराम त्यांना ‘देव’ म्हणत असत, असे तिथे लिहिले आहे. मोरया गोसावी शंभरहून अधिक वर्षे जगले. नव्वदीनंतर त्यांनी कुमारिकेशी लग्न केले वगैरे काय काय तिथे लिहिलेले आहे. मला ते सगळेच कळले असे नाही! तिथे जे वाचले, ते तसे नोंदवून घेतले. आसपास बसलेल्या लोकांशी थोड्या गप्पा मारल्या.
मोरया यांना गणपतीची मूर्ती मिळाली होती, ती ठेवलेला मंगलमूर्ती वाडा आहे जवळ! मग तिकडे गेले चालत. जवळच आहे. वाडा अतिशय छान आहे. तिथे टॉयलेटदेखील चांगले आहेत. एकट्या फिरणाऱ्या बाईला छान थांबा आहे हा वाडा. तिथे भरपूर फोटो काढले. तिथून समोरच्या गल्लीतच पाच मिनिटं चालत चापेकर यांचा वाडा आहे. तोही छान आहे. तिथे काही महिला कामासाठी आलेल्या असतात. त्या छान बोलतात. भरपूर फोटो काढू देतात. त्या महिला गुरुकुल
ही एक शाळा एके ठिकाणी चालवितात. ती शाळा छान आहे, असे कळले आहे. पुढील खेपेस शाळा बघेन. चापेकर वाड्यात खाली, वर आणि मागे विहिरीकडे, जिथे त्यांनी शस्त्रे लपविली होती, ते पाहता येते. इथेही टॉयलेट आहे. विनंती करून ते ‘एकट्या- दुकट्याला’ वापरता येते!
पुढील स्लाइड्सवर वाचा, उर्वरित लेख...