आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्रकन वाढतात पोरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्रकन वाढतात पोरी
जसा वेल मांडवावरी...
आत्ताच या ओळी एका मैत्रिणीच्या पोस्टवर वाचल्या आणि आज संध्याकाळचा प्रसंग आठवला.
भिंतीवर बालकृष्ण वेशातला अन्वीबाळाचा एक गोड फोटो आहे, त्याच फोटोखाली सात वर्षांची अन्वी पोरगी बसली होती. त्या दोन रूपांकडे पाहत अशीच काही वाक्ये बोललो, मुली किती पटकन मोठ्या होतात ना टाइपची. अर्थातच हे बोलताना माझा चेहरा आनंदी नव्हता, तर थोडासा गंभीर, उतरलेला होता.
ते पाहून अन्वी विचारात पडली.  जे काही झालंय, त्याला नक्कीच काही तरी कारण असणार, आणि त्यावर नक्कीच काहीतरी उपाय असणार, हा आत्मविश्वास चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
त्याचसोबत... जे काही घडलंय त्यात बाबाचीच चूक असणार, आणि ते बरोबर कसं करायचं हे मलाच पक्कं ठाऊक असणार, हे डोळ्यातली चमक आणि ओठांवरचे कुत्सित, विजयी हसू सांगत होतं.
तर, मला जास्त वाट बघायला न लावता, प.पू. अन्वीमाँ सांगत्या झाल्या.
एक वेळ माझ्याकडे डोळे रोखून रागाने बघितले, नाक फेंदारले, दातओठ खाल्ले. एक मोठा उच्छ्वास टाकून,
‘बाबा, तुम्ही माझे बड्डे का सेलिब्रेट केले? बघ त्यामुळेच मी मोठी झाले.’
मला पटतंय याची खात्री करण्यासाठी काही क्षण माझ्या डोळ्यात टक लावून पाहिले. बादरायण संबंधसुद्धा इतका असंबद्ध नसावा याव्यतिरिक्त इतर काहीच न सुचल्याने मी हलकीच मान हलवली. तो माझा होकार समजून, समस्येवर तोडगा सुचवला,
‘इथून पुढे माझा बड्डे सेलिब्रेट नाही करायचा, म्हणजे मी एवढीच राहीन. मोठी नाही होणार आणि तुम्हाला सोडूनही नाही जाणार.’
बोट नाकासमोर धरून ‘ओके?’ असे दरडावून त्यावर संमती मिळवली.
 
postboxpravin@gmail.com
बातम्या आणखी आहेत...