आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बुध्दिमत्‍ता कुठून येते?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या मेंदूचा आकार साधारण आपल्या झाकल्या मुठीइतका असतो.
काही तरी विषय निघाल्यावर, शाळेत शिकलेलं, खरं तर घोकलेलं, हे वाक्य अचानक आठवलं. लेकरासमोर स्वतःची हुशारी दाखवायला हाताची मूठ घट्ट पकडून दाखवलं आणि तिलासुद्धा तिची मूठ पकडायला सांगितली.

हा बघ, माझा ब्रेन एवढा मोठा आणि तुझा ब्रेन इतका आहे.’


‘काहीही हं बाबा’वाले भाव चेहऱ्यावर कायम ठेवत माझ्या मुठीकडे पाहिले, नंतर तिच्या स्वतःच्या मुठीकडे पाहिले. काहीतरी चुकतंय... भयंकर चुकतंय. चेहरा गंभीर करून पुन्हा एकदा माझ्या मुठीकडे पाहिले, तिच्या हाताने माझ्या मुठीचा आकार चेक केला, स्वतःच्या मुठीच्या आकाराशी तुलना केली. दोन क्षण विचारमग्नतेत घालवले.
आणि एकदाची बोलली,


‘बाबा, तुझा ब्रेन मोठ्ठा आहे, पण मी तुझ्यापेक्षा स्मार्ट का आहे मग?’
आपण असे मानून घेऊ की, या प्रश्नात अज्जिब्बात कुत्सितपणा नव्हता, होती फक्त निरागसता. माझ्या दांड्या गुल. मी फक्त माझ्या झाकल्या मुठीकडे पाहात बसलो. कधी काळी केलेल्या सोळा सोमवारांना साक्षी ठेवत आजच्या या सोमवारी एक अनपेक्षित साथीदार मदतीला धावून आला.

 

‘अरे अन्वी, तू बाबाची मुलगी आहेस ना, त्यामुळे तू स्मार्ट आहेस.’
आश्चर्य, अगतिकता, संभ्रम, आनंदावेग…मला काही काही सुचेना.


आनंद झाला माझ्या मनाला.
सोन्याचा दिस आज उगवलाय गं.
आमच्या ह्यांनी केली माझी स्तुती.
आज देव पावलाय गं.


माझा आनंद माझ्या चेहऱ्यावर दिसताक्षणीच त्यावर विरजण टाकायचे काम इमानेइतबारे अन्वीने त्वरित केले.
एका हाताने सिंधूला थांबवत, तिला दुरुस्त केले,
‘नाही आई, मी तुझी मुलगी आहे!’  


- प्रवीण क्षीरसागर, न्यूयॉर्क 
postboxpravin@gmail.com

बातम्या आणखी आहेत...