आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनाचा गोंधळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चौघी खेळत होत्या, मी बाजूलाच इतर काही काम करत उभा होतो. मध्येच अन्वीने माझ्या पायाला घट्ट मिठी मारली अन‌् कंबरेवर डोके टेकवून उभी राहिली. तिला अध्येमध्ये असे प्रेमाचे भरते येते. मी फक्त एका हाताने तिच्या डोक्यावर थोपटून माझे काम चालू ठेवले. थोड्या वेळाने मी जागचा हललो तर अन्वी मिठी न सोडता तशीच माझ्यासोबत मी जाईन तिकडे आली. हे आज जरा जास्तीच होतं.

आम्ही पूर्वी राहायचो तिथे शिवाली (चौदा वर्षे) अन‌् रिद्धीशा (नऊ वर्षे) या दोघी बहिणी अन्वीच्या खास मैत्रिणी. वयाने थोड्या मोठ्या असल्या तरी त्या दोघी अन्वीला खूप छान सांभाळून घेतात. तिच्या कलाने खेळतात. इकडे आल्यापासून अन्वी त्यांना खूप मिस करते. काल त्या इकडे अन्वीला भेटायला आल्या, तेव्हापासून अन्वी जाम म्हणजे जामच खूश आहे. रात्री साडेबारा वाजेपर्यंत खेळत होत्या, घरातच खुर्च्यांवर चादर अंथरून छोटासा तंबू बनवून त्यात झोपल्या, इ. इ. त्या दोघींना आमची धाकटी लेक वीरासुद्धा खूप आवडते, हे सांगणे न लगे.
 
तर, आज चौघी खेळत होत्या, मी बाजूलाच इतर काही काम करत उभा होतो. मध्येच अन्वीने माझ्या पायाला घट्ट मिठी मारली अन‌् कंबरेवर डोके टेकवून उभी राहिली. तिला अध्येमध्ये असे प्रेमाचे भरते येते, त्यामुळे मी फक्त एका हाताने तिच्या डोक्यावर थोपटून माझे काम चालू ठेवले. थोड्या वेळाने मी जागचा हललो तर अन्वी मिठी न सोडता तशीच माझ्यासोबत मी जाईन तिकडे आली. हे जरा जास्तीच होतं. तिकडे गेल्यावर मी वाकून बघितले तर गाल ओलांडून गंगा-जमुना गळा भिजवायला खाली उतरत होत्या. तोंडातून हूं नाही की चूं नाही, फक्त डोळे घळाघळा वाहात होते. मी खाली बसून तिला ‘काय झाले?’ विचारले, त्यावर फक्त मान हलवून ‘काही नाही’ असे उत्तर दिले आणि परत मला बिलगली.
 
‘शिवाली-रिद्धीशा काही बोलल्या का? तुमचे भांडण झाले का?’ त्यावर पाण्याची अजून एक धार सोडत तेच उत्तर, ‘नाही.’
‘मग आई काही बोलली का?’ तर ‘नाही.’
‘मग का रडते आहेस?’
आता थोड्या जास्त शब्दांत उत्तर मिळाले, ‘I really don’t know but I feel like crying.’
खाली बसलो, तिला मांडीवर बसवले. अजून थोडं घट्ट मिठीत घेऊन पाठ थोपटली, ‘Thats perfectly fine, पण काहीतरी कारण असेलच ना?’
‘मला काहीच कळत नाही.’
‘Ok, let me help you.’
आवंढा गिळत, मान उभी हलवत, ‘Okay.’
‘डोळे बंद कर, रडणे थांबव आणि आता काय काय झालंय याचा विचार कर.’
थोडा वेळ तशीच डोके माझ्या छातीवर ठेवून मांडीवर बसून राहिली.
‘बाबा, तू कोणाला सांगणार नाहीस?’
‘नाही सांगणार, पक्का.’
‘बाबा, I know it’s not right.’
‘That’s fine, सांग मला.’
‘मला माहीत नाही मला असं का होतंय.’
‘काय होतंय नानुला?’
‘बाबा, I love baby पण...’
‘पण काय?’
‘रिद्धीशा-शिवाली वीराबरोबर खेळतात and that’s fine. माझ्याबरोबर आत्ता खेळत नाहीत, त्यामुळे मला रडायला होतंय.’
या वाक्याबरोबर अजून मुसमुसत रडायला लागली. मी फक्त पाठ थोपटत राहिलो. थोडा वेळ असाच गेला.
थोड्या वेळाने उठून उभी राहिली. स्वतःच स्वतःचे डोळे पुसत, ‘बाबा, प्लीज तू त्यांना काही बोलू नकोस.’
‘नाही रे बोलणार मी.’
‘पण तू त्यांच्या पेरेन्ट्सला आणि माझ्या आईला सांगू शकतोस. पण त्यांना सांग रिद्धीशा-शिवालीला नको.’
थोडे हसत ‘ओके, सांगतो.’ त्यावर तीसुद्धा थोडीशी हसली. तितक्यात रिद्धीशा अन्वीला शोधायला तिथे आली. अन्वी तिला जाऊन मिठी मारत मला बोलली, ‘We have solved it.’  रिद्धीशाने काहीच न कळल्याने विचारले, ‘What have you solved?’
माझ्याकडे पाहून खुद्दकन हसत बोलली, ‘That’s my and dad’s secret!’
आणि तिचा हात धरून खेळायला पळाली.
 
 postboxpravin@gmail.com
बातम्या आणखी आहेत...