आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅशन सेन्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंधूने विचारले ‘काय झाले?’ नजर माझ्यावरच स्थिर ठेवून त्याच रागाच्या आवाजात अन्वी बोलली, ‘बाबाला का विचारतेस तू? त्याला अज्जिब्बात फॅशन सेन्स नाही.’ 
‘हाड्रेस कसा दिसतोय मला?’
फिटिंग रूममधून बाहेर येत, कंबर पंच्याहत्तर अंशाच्या कोनात एकदा उजवीकडे तर एकदा डावीकडे वळवत आमच्या ह्यांनी फिटिंग रूमबाहेर तिष्ठत उभ्या असलेल्या नंदी(बैला)ला विचारले.
एका हातातल्या अवजड पिशव्या दुसऱ्या हाताकडे सरकावत, मुंग्या लागलेला पाय जरासा हलवत मी बोललो, ‘ठीक आहे, पण खास नाही.’
आता प्रत्येक ड्रेसला ‘चांगला दिसतोय’ हे एकच वाक्य कसं बोलणार. कारण तसे वाक्य बोललेलो असले तरी त्यानंतर अजून काही ड्रेस घालून परत तोच प्रश्न विचारला गेला होताच.
आमच्या कोणत्याही संभाषणात हमखास पचकणारं वाद्य अजून कसं वाजलं नाही? हा विचार करत बाजूला पाहिले तरहाताची घडी घालून,
डावा पाय गुडघ्यात थोडासा वाकवून, 
मान तिरकी करून, डोळे बारीक करून, 
ओठ एकमेकांवर हलकेसे दाबून अन्वीताई गूढ चेहऱ्याने आपल्या मातोश्रींना आपादमस्तक न्याहाळत होत्या.
नंतर एक गयागुजरा कटाक्ष माझ्याकडे टाकून, रागात सिंधूकडे पाहून, ‘आई...’
माझ्यासाठी हे अगदी अनपेक्षित होते. कधी नाही ते अन्वीला माझं पटलेलं दिसतंय हे पाहून ‘अजि म्या धन्य जाहलो’ विचाराने ऊर भरून आला. निर्विकार चेहऱ्याने सिंधूने विचारले, ‘काय झाले?’ नजर माझ्यावरच स्थिर ठेवून त्याच रागाच्या आवाजात अन्वी बोलली, ‘बाबाला का विचारतेस तू? त्याला अज्जिब्बात फॅशन सेन्स नाही.’ त्या वाक्यानंतर विश्राम न घेताच रागाचा स्वर अचानक प्रेमळ करत, ‘It’s looking awesome and don’t ask him again, ask me!’ मघाशी भरून आलेल्या उराला अश्शी जोरात टाचणी टोचली म्हणून सांगू! हव्वा तर गेलीच, पण जोरात कळ आली.

- प्रवीण क्षीरसागर, न्यूयॉर्क
postboxpravin@gmail.com
बातम्या आणखी आहेत...