आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेडिओथेरपी (radiotherapy) दरम्यान घ्यायची काळजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅन्सरची वाढ खुंटवण्यासाठी रेडिओथेरपी दिली जाते. ही चिकित्सा काही क्षणांसाठी केली जात असली तरी तिचे दुष्परिणाम आहेतच. त्यातील काही तात्पुरते असतात तर काही नेहमीसाठी असतात. अशा वेळी हिंमत खचू न देता सामोरे जाणे हाच सकारात्मक विचार ठरेल.


तज्ज्ञांच्या मते तात्पुरते दुष्परिणाम हे थेरपीच्या 7 व्या ते 10 व्या दिवसापासून सुरू होऊन संपल्यावर 2-3 आठवड्यांत कमी होतात. नेहमीसाठी होणारे दुष्परिणाम म्हणजे त्याच्या लगतच्या एखाद्या अवयवाची विकृती. हे परिणाम कमी करण्यासाठी, नियंत्रित ठेवण्यासाठी किंवा टाळण्यासाठी हॉलिस्टिक अ‍ॅप्रोच ठेवणे गरजेचे आहे. यात रुग्णांचे, त्याच्या नातेवाइकांचे समुपदेशन होणे अत्यंत गरजेचे आहे. रेडिओथेरपी सुरू असताना मोकळे सुती कपडे घालावे आणि शरीरावर ज्या ठिकाणी रेडिओथेरपी देतात, ती खूण मिटवू नये याची काळजी घ्यावी.


*तात्पुरते दुष्परिणाम व घ्यायची काळजी :
थकवा : किमोथेरपी किंवा शस्त्रक्रिया झाल्याने रक्तातील विशिष्ट पेशी कमी होतात व भूक कमी होते. त्यामुळे थकवा येतो. हालचाल कमी होते. मानसिक नैराश्य आल्याने थकवा जाणवतो.
उपाय : यात वाचन, गाणे ऐकणे, काहीतरी कामात स्वत:ला गुंतवणे, शिवाय 1ु6 ु12 हे व्हिटॅमिन्स कमी होतात. म्हणून गव्हांकुराचा रस घेणे, थोड्या थोड्या मात्रेत जेवण करणे, जेवणानंतर वामकुक्षी करावी. जुने लिंबाचे लोणचे खाणे, खोब-याच्या तेलाची पूर्ण अंगाला हलक्या हाताने मालिश करणे.
*कधी-कधी थुंकी, उलटी, लघवी, संडास यातून रक्त येणे अशी लक्षणे जाणवतात.
उपाय : यात मसालेदार तळलेले पदार्थ, मद्यपान, सिगारेट, तंबाखू-पान टाळणे महत्त्वाचे आहे. पाणी जास्त पिणे. नारळाचे पाणी घेणे, प्रवाळयुक्त गुलकंद खाणे. डिंक तुपात फुलवून साखर पाणी टाकून उकळून घेणे, धने, जीरपूड 1/2 चमचा, 1/2 वाटी पाण्यात 2 तास भिजल्यावर घेणे, त्रिफला चूर्ण पाण्यात उकळून थंड झाल्यावर गुळण्या कराव्यात.
* तोंडाला कोरड पडणे, तोंड सुकणे यामुळे सर्व काही बेचव लागते. अधिक दौर्बल्य येते.
उपाय : पातळ जेवण घेणे, सोजी, उपमा, खिचडी, गव्हाचा चीक शिजवून घेणे. बाजरी, ज्वारी, नागलीचे पीठ ताक तसेच पाण्यात शिजवून जिरेपूड, मीठ, साखर, तूप घालून खाणे. रसदार फळे गरम पाण्यात धुऊन चाट मसाला टाकून खाणे. खडीसाखर, डिंकाचा खडा तोंडात ठेवणे. खोबरा कीस-पिठीसाखर घेणे. बडीशेप अर्क-सौफ बारीक करून 1 चमचा 1 वाटी पाणी थोडी साखर टाकून घेणे अन् तेही वारंवार घेणे. electrol powder पाण्यात घेणे. शिरा, अंडी असे जड पदार्थ खाऊ नयेत. केस गळणे हा तात्पुरता परिणाम असून त्यावर निराश न होता विग वापरणे हा त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन होय. केस उपचारांनंतर परत येतात. यासाठी गायीचे तूप 45 दिवस 2-2 दिवसातून नाकात घालावे. त्वचेवर लालसरपणा, कोरडेपणा आढळल्यास चंदन, ज्येष्ठमधयुक्त लेपाचा प्रयोग गुलाबजलात करावा. स्वच्छतेकडे लक्ष ठेवून लेप लावावा. जास्त उन्हात फिरू नये. पाणी जास्त प्यावे.
अतिसार झाल्यास : निंबू सरबत , इलेक्ट्रॉल पावडरचा वापर करावा. दहीभात, भाताची पातळ पेज जिरे, मीठ टाकून साबुदाणा खीर पातळ करून खाणे. डाळिंब, मोसंबी, निंबू यांचा वापर करावा. लवकरात लवकर औषधोपचार करावा.
रक्तकण, पांढ-या पेशी कमी होणे : यामुळे निराश होता कामा नये. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासून शरीराला वाचवा. व्याधिक्षमत्व कमी झाल्यामुळे आजार लवकर होतात. वारंवार हात धुणे, जेवण व्यवस्थित करणे, वजनाकडे लक्ष द्यावे, प्रोटीन्सचे प्रमाण जेवणात ठेवावे. यासाठी लवकर पचणारे प्रोटीन्स खावे. उदा. सत्तू, दूध, गव्हात सोयाबीन मिसळणे. सत्तू म्हणजे दाळवे भाजून बारीक करून त्यात साखर , मीठ, दूध घालून रोज खाणे. तीळ, शेंगदाणे, जवसाची चटणी, मूग, मसूर, चणाडाळ भिजवून, उकडून खावे. अंडी, बदाम, मांसाहार टाळावा. या सर्व सूचनांकडे लक्ष दिल्यास आपला रेडिओथेरपीचा काळ सुखावह होईल.