आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयुर्वेदातील एक गर्भसंस्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्त्रीचे आरोग्य चांगले नसेल, मातृत्व मुळात सर्व दृष्टीने सुदृढ नसेल तर पुढील पिढी चांगली असूच शकणार नाही. स्त्रीच्या आरोग्याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आली आहे. कारण आई-वडील, विशेषत: आईची शारीरिक व मानसिक स्थिती उत्तम असेल तरच जन्माला येणारे मूल सुदृढ, हुशार, निरोगी निघेल. बुद्धिमान आणि आरोग्यसंपन्न भावी पिढी निर्माण होण्यासाठी गर्भसंस्कार जसे आवश्यक आहेत, तशीच गर्भधारणेचा निर्णय घेण्यापूर्वी त्यासाठीचे योग्य वय काय इथंपासून पती-पत्नीने गर्भधारणेची मानसिक तयारी कशी करावी, बीजशुद्धी कशी करून घ्यावी, अशा अनेक अनुषंगिक विषयांची माहिती असणे आवश्यक ठरते.
ज्याप्रमाणे चांगले पीक येण्यासाठी योग्य ऋतू , मशागत केलेली जमीन, पुरेसे पाणी व संपन्न बीज या सर्व गोष्टीचा समन्वय आवश्यक असतो. गर्भधारणेपूर्वी पती-पत्नींनी स्वत:च्या शारीरिक आरोग्यासाठी केलेली तयारी. योग्य गर्भधारणा व्हावी म्हणून केलेली उपाययोजना आणि गर्भ राहिल्यानंतर 280 दिवस घ्यावयाचे उपचार अतिशय महत्त्वाचे ठरतात.
गर्भाचे मन आपल्या आई-वडिलांच्या विशेषत: आईच्या मनाशी संबंधित असते. गर्भवती स्त्री ज्या प्रकारच्या कथा वार्ता ऐकेल, जे काही गीत-संगीत ऐकेल, त्याच्या अनुसार बाळाचे मन घडत जाते.
शूर, हुशार, सुंदर व निरोगी गर्भाची इच्छा असणा-या गर्भिणीने तशा गुणांनी युक्त आदर्श व्यक्तीच्या कथा ऐकाव्यात, त्यांचे जीवनचरित्र वाचावे.
ध्वनिसंस्कार : गर्भावरील आदर्श संस्कार ध्वनीच्या माध्यमातून सर्वात प्रभावीपणे होऊ शकतात. कारण मंत्र, संगीत असा कोणत्याही प्रकारचा ध्वनी आणि त्यातील अर्थ, मन व बुद्धीने तर ग्रहण होतोच, परंतु ध्वनीलहरीची कंपने प्रत्यक्षपणे ही माता व गर्भ दोघावरही परिणाम करतात. त्यामुळेच गर्भसंस्कार संगीताचा उपयोग गर्भाचे आरोग्य, जन्माला येणा-या बालकाचे व्यक्तिमत्त्व या दोहोसाठी अतिशय चांगला होतो. अभिमन्यू जसा पोटात असतानाच त्याने चक्रव्यूह भेदन ऐक ले आणि त्याने ते करून दाखवले. त्याप्रमाणे प्रत्येक गर्भ 9 महिन्यात जे ग्रहण करतो, त्याप्रमाणे घडतो. बुद्धिमान, संपन्न आणि प्रगत पिढी निर्माण होण्यासाठी गर्भसंस्कार हा एकमेव मार्ग आहे.
उत्तम गर्भासाठी स्त्रीचे आर्तव शुद्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. दोषयुक्त शुक्राणूमुळे होणारे मूल अल्पायुषी अशक्त आणि कुरूप होऊ शकते. गर्भधारणेपूर्वी स्त्री-पुरुष दोघांनीही त्रिदोष संतुलनासाठी पंचकर्माद्वारे शरीरशुद्धी करून घेणे आवश्यक असते. रक्तधातूच्या पोषणासाठी स्त्रियांच्या आहारात खजूर, काळ्या मनुका, पालकासारख्या हिरव्या पालेभाज्या, डाळिंब, भिजवलेले अंजीर, यांचा अवश्य समावेश करावा. स्त्री-पुरुषांचे मन ज्या प्रकारच्या भावनांनी युक्त असते त्याचा प्रभाव गर्भाच्या मनावर पडतो. या प्रमाणे सुंदर, निरोगी, बुद्धिमान तसेच अनुवांशिक आजार मुलांमध्ये नको असतील तर नऊ महिने स्त्रीने गर्भसंस्कार केले पाहिजेत. त्यासाठी तिचा आहार-विहार-मानसिक प्रसन्नता व बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आयुर्वेदाने औषधी योजना व गर्भसंस्कार सांगितले आहेत. मग चला तर उत्तम पिढीसाठी गर्भसंस्कार करू या!